snake sakal
मराठवाडा

Parbhani : घोणस सापापासून सावधगिरी बाळगा

राजेश नागरे

गंगाखेड : थंडीची चाहूल लागली की मोठ्या प्रमाणावर घोणस साप दिसायला लागतात. थंडीचा काळ हा घोणस सापांचा मिलनकाळ असतो. या विषारी सापाच्या जातीपासून सावध राहावे, असे आवाहन सर्पमित्र गजानन साखरे यांनी नागरिकांना केले आहे.

घोणस बोजड शरीराचा साप असून, जवळपास ३ ते ५ फूट लांबीचा असतो. डोके मोठे, चपटे व त्रिकोणी आणि मानेपासून वेगळे दिसते. डोके व पाठीवर लहान लहान शल्क (खवले) असतात. शेपूट लहान असते. पाठीकडचा रंग फिकट ते गडद तपकिरी असून प्रत्येक ठिपक्याच्या कडेला पांढरी किनार असते. रांग पोटाचा रंग फिकट पांढरा असून त्यावर रुंद व आडवे पट्टे असतात. त्याच्या फुत्काराचा आवाज मोटारीच्या चाकातील हवा सोडताना होणाऱ्या आवाज सारखा असतो. इतर सापांच्या तुलनेत ते मोठे असतात.

उंदीर, बेडूक, सरडे हे घोणसचे भक्ष्य असल्यामुळे शेतजमिनीत व त्यालगतच्या भागात आणि ग्रामीण भागातील मनुष्यवस्तीतही तो आढळतो. पहाटे व रात्री तो क्रियाशील असतो. तसेच ताकदवान आणि विषारी असल्यामुळे तो दिवसादेखील निर्धास्तपणे वावरतो. गर्भावधीमध्ये अंडी मादीच्या शरीरातच असतात. घोणस मादीला पिले होतात. घोणस सहसा माणसाच्या वाटेला जात नाही.

घोणसाचा हातापायाला दंश झाला असता तत्काळ रूग्णालयात जाऊन प्रतिविष टोचणे, हा त्यावर इलाज आहे. घोणसच्या विषामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात किंवा रक्त कोशिका फुटतात. मुत्राशय निकामी होवु शकते. वैद्यकीय संशोधनात त्याच्या विषाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हिवाळ्यात हा अतिविषारी घोणस साप पासून सावध राहावे व दिसता क्षणी व्यवस्थित जंगलात सोडण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन सर्पमित्र साखरे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfers: निवडणूक आयोगानं झापल्यानंतर आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या! लवकरच जाहीर होणार निवडणूक?

विधानसभेसाठी मनसेच्या तयारीपासून ते टीम इंडियातील खेळाडूला शिक्षेपर्यंत, वाचा आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

India vs Pakistan नोव्हेंबरमध्ये समोरासमोर? जाणून घ्या कोणती स्पर्धा अन् कुठे भिडणार

Nana Patole: हिंदुत्वाचं राजकारण नुसतं मतांसाठी करणार का? महायुतीवर नाना पटोले संतापले, काय म्हणाले?

Diwali Special Train: दसरा अन् दिवाळीसाठी मुंबईहून विशेष ट्रेन, जाणून घ्या २६ फेऱ्यांची माहिती

SCROLL FOR NEXT