Parbhani District Collector Anchal Goyal  esakal
मराठवाडा

Parbhani : अवकाश संशोधनात परभणीचे नाव उज्ज्वल करा ; जिल्हाधिकारी गोयल

कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा

परभणी : भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेमध्ये आतापर्यंत मोठ्या शहरांची मक्तेदारी होती. ती या कार्यशाळेच्या माध्यमातून मोडीत निघणार आहे. परभणीला ही संधी मिळाली आहे. त्या संधीचे सोने करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी रविवारी (ता.२२) केले.

शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात श्रीमती गोयल बोलत होत्या. महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाउंडेशनचे राष्ट्रीय समन्वयक एम. सुरेश, राज्य समन्वयक मनीषा चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, प्राचार्य बाळासाहेब जाधव, जिल्हा समन्वयक

राजकुमार भांबरे, मेघश्याम पत्की, श्री. कुलथे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यातील नागपूर, पुणे आणि परभणी येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, देशाला भविष्यात लागणारे शास्त्रज्ञ अशा प्रकारच्या कार्यशाळांमधून मिळतील, असा आशावादही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाल्या, ‘‘तमिळनाडूतील पट्टीपुरम येथून एकाचवेळी १५० उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यात परभणीच्या १५ उपग्रहांचा समावेश राहणार आहे, ही परभणीकरांसाठी आनंददायी बाब आहे. मार्टीन ग्रुपचे स्वयंसेवक पदाधिकारी, संचालक, जिल्हा परिषद आणि मनपाच्या सहयोगाने ही कार्यशाळा आयोजित करण्याचा परभणीला मान मिळाला. या कार्यशाळेत आज बाल वैज्ञानिक सहभागी झाले आहेत.

त्यांच्यामुळे देशासाठी आणि जिल्ह्यासाठी सुवर्णसंधी आहे. त्या संधीचे सोने करावी’’, असे आवाहनही त्यांनी केले. साक्षी यादव हिने सूत्रसंचालन केले. राजकुमार भांबरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आनंद पाथ्रीकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT