file photo 
मराठवाडा

परभणी : सेंद्रिय पद्धतीने पेरुच्या यशस्वी लागवडीतून भरघोस उत्पन्न; मेघा सावंतची धडपड

अनिल जोशी

झरी  ( जिल्हा परभणी) : झरी येथील उच्चशिक्षित महिला मेघा विलासराव सावंत यांनी पतीच्या अकाली निधनानंतर खचून न जाता निर्धास्तपणे शेतीची धुरा सांभाळत सध्या त्या चाळीस एकर शेतीची जबाबदारी सांभाळतात. शेतीत सोयाबीन, तूर, हरभरा या पारंपरिक पिकाबरोबरच फळ झाडांची लागवड केली आहे. पेरुची लागवड करुन सेंद्रिय पद्धतीने भरघोस उत्पादन त्या घेत आहेत.

जिंतूर- परभणी रोडवर झरी गावाजवळ महात्मा गांधी कॉलेजच्या पाठीमागे मेघा सावंत यांची वडिलोपार्जित चाळीस एकर शेती आहे. त्यांचे शिक्षण एम ए पर्यंत झाले आहे. त्यांचे पती विलासराव सावंत यांचे वीस वर्षापूर्वी अकाली निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय बावीस वर्षे होते. आणि विक्रांत हा मुलगा केवळ दोन वर्षांचा होता. मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी मन घट्ट करुन स्वतः सावरल्या त्यावेळी सासर आणि माहेरकडील सर्वांनी मोठा आधार दिला. पती गेल्याचे दुः ख सहन करुन पुढे वाटचाल करीत असताना काही दिवसांनी अचानक त्यांचे सासरे गेले. त्यांच्यावर एकामागून एक दुः खाचे डोंगर येऊनही मुलांसाठी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. सन 2014 मध्ये ललित पेरुचे तीन हजार 800 झाडे त्यांनी लावली. त्यानंतर योग्य नियोजन करुन सदरील झाडांना तीन वर्षानंतर चांगल्या प्रकारची फळे लागल्यामुळे आर्थिक उत्पन्न मिळू लागले.

रसायन मुक्त फळाचे उत्पादन

पेरुच्या झाडांना वापसानुसार, ठिबकद्वारे पाणी देता येते, मेघा सावंतकडे देशी गोवंश असल्यामुळे त्या झाडांना शेण खतासह जीवनामृत लिंबोळी खत, गोमूत्र अशा सेंद्रिय मात्रा देतात. त्यामुळे फळे चमकदार आणि रसायनमुक्त तयार होतात. पांढरी माशी हा रोग प्रामुख्याने येतो त्यावर जीवन अमृताची फवारणी करुन नियंत्रण केले जाते. महिला मजुरदारामार्फत बागेतील निर्णय खुरपणी करुन शेत तणविरहित ठेवले जाते. गरजेनुसार झाडाला फांद्यांची छाटणी करतात त्या स्वतः ट्रॅक्टर रोटावेटरच्या साह्याने आंतर मशागत करतात. दररोज सकाळ, संध्याकाळ बागेतून फिरत आणि झाडांची पाहणी करतात. झाडांना पाणी बरोबर मिळते का ? रोगराईचा प्रादुर्भाव झाला का ? फांद्यांचे बारा वाजता याचा आढावा घेतात. फळधारणेसाठी मे महिन्याच्या शेवटच्या झाडांना पाण्याचा ताण दिला जातो. विकास त्यामुळे यावर्षी त्यांना विक्रम उत्पादन होऊन एकीकडे शेतकरी दुष्काळाच्या छायेत होरपळत असताना मेघा सावंतसारख्या महिला शेतकऱ्याकडून शिकून शेती केल्यास कमी पाण्यावर व रसायनमुक्त शेती शेतकऱ्यांना अधिक चांगली फायदेशीर ठरल्याचे त्यांनी सांगितले. 

वडिलांचे वेळोवेळी मार्गदर्शन

घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर उदरनिर्वाहासाठी शेती करण्याची त्यांनी ठरवले. सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने पीक घेत असताना शेती करु लागल्या त्यांचे वडील कृषिभूषण कांतराव देशमुखही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. शेतीसंदर्भात त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन देखील करु लागले. वडिलांच्या मार्गदर्शनामुळे आज त्या आधुनिक पद्धतीची शेती करीत आहेत. चाळीस एकर शेती क्षेत्रात तीन विहिरी व काही कूपनलिका खोदल्या असल्याचे तसेच गाय- बैल असे मोठे पशुधन देखील त्यांच्याकडे आहे.

पारंपरिक पिकाबरोबर पेरु बागेत अल्पावधीतच भरघोस उत्पादन मिळाले. त्यामुळे शेती क्षेत्रात विविध पिकांना नवनवीन प्रयोग राबवण्याची चालना मिळाली. शेतीतून चांगले उत्पन्न मिळण्याच्या अमर्यादित संधी नक्की आहेत. हे मी पेरुच्या उत्पादनातून अनुभवली.
- मेघा सावंत

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT