file photo 
मराठवाडा

परभणी : शेततळ्यातील पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू; जांब (रेंगे) येथील घटना, गावावर शोककळा

गणेश पांडे

परभणी ः शेततळ्यात पडलेला चेंडू काढण्यासाठी गेलेल्या युवक बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या सोबत असणाऱ्या दुसऱ्या एका युवकाने त्याला वाचविण्याच्या प्रयत्न केला. परंतू या घटनेत वाचविणारा युवकच पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना जांब (ता. परभणी) येथे सोमवारी (ता. 29) घडली. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली होती.

परभणी तालुक्यातील जांब ( रेंगे ) या गावातील काही तरुण धुळवडीच्या सुट्टीनिमित्य गावालगत असलेल्या शेतात क्रिकेट खेळत होते. त्यावेळी अचानक शेतातील शेततळ्यात गेल्याने माऊली रेंगे नामक युवक शेततळ्याजवळ गेला. अचानक माऊली रेंगे याचा पाय घसरुन तो शेततळ्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी शरद प्रकाशराव रेंगे (वय 23) याने शेततळ्या उडी घेतली. तोपर्यंत आरडा ओरड केल्याने आजू- बाजूच्या लोकांनी धाव घेत दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात माऊली रेंगे याचा जिव वाचला.

परंतू शरद रेंगे या तरुणांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. शरद रेंगे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची बातमी गावात समजताच अनेक गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. शेतातील घटनास्थळावर लोकांची गर्दी जमली होती. गावकऱ्यांच्या अखेर प्रयत्नानंतर शरद रेंगे याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. सायंकाळी उशिरा त्यांच्यावर जांब येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत शरद रेंगे याच्या पश्चात वडील, आई, आजोबा, आजी, भाऊ, विवाहित बहिणी असा परिवार आहे.

गावावर शोककळा
ऐन धुळवड सणाच्या दिवशीच ही ह्रदयद्रावक घटना घडल्याने गावात शोककळा पसरली होती. गावातील अनेक तरूणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. काही राजकीय नेत्यांनीही देखील गावात येवून रेंगे कुटुंबियांचे सात्वंन केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT