Parbhani News sakal
मराठवाडा

Parbhani News: जिल्हा परिषदेसाठी इच्छुक कामाला

होणार विधानसभेची रंगीत तालीम

सकाळ वृत्तसेवा

देवगावफाटा : सेलू तालुक्यातील नुकत्याच ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. ग्रामपंचायत निवडणुकीचे तापलेले वातावरण शांत झाले असतानाच आता तालुक्यातील इच्छुकांना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वेध लागले आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडे तर विधानसभेची रंगीत तालीम म्हणून जिल्हा परिषदेच्या निवडणुकांकडे पाहिले जाते. त्यामुळे ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट आणि गणातील गावांमधील स्थिती निकालानंतर स्पष्ट झाल्यामुळे इच्छुकांनी आता दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातून नेतृत्व करणारी कार्यशाळा म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते.

तालुका पातळीवर नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दुसऱ्या फळीतील समितीच्या निवडणुकीची संधी दिली जाते. गावाच्या आकारानुसार जिल्हा परिषद गटातील गावाची संख्या निश्चित करण्यात आलेली असते.

मोठ्यासह लहान-मोठ्या गावांचा जिल्हा परिषद गटात समावेश असतो. ग्रामीण भागात एका जिल्हा परिषद गटात दहा ते बारा गावांचा समावेश करण्यात येतो. इच्छुक उमेदवार आपल्या गटातील गावांवर लक्ष ठेऊन असतात.

ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त ते आपल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पेरणी करीत असतात; कारण कोणतीही निवडणूक लढायची म्हटले की, कार्यकर्त्यांना सांभाळण्यापासून ते वैयक्तिक अडीअडचणीला धावू जाण्यापर्यंत प्रयोग करावे लागतात.

त्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर अनेक इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली आहे. यावेळीच्या सेलू तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने मुसंडी मारत प्रस्थापितांना धक्का दिला आहे.

शांत बसवेना

जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुका वर्षभरापासून लांबल्या आहेत. त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या अनेक इच्छुक मंडळीची प्रचंड कोंडी झाली आहे.

या निवडणुका नेमक्या कधी होणार? याची स्पष्टता लवकर होत नसल्याने तालुक्यातील अनेक इच्छुकांना ‘धड तयारीही करता येईना अन् शांतही बसवेना’ अशी अवस्था इच्छुकांची झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

Constitution Day 2024 : संविधान दिन साजरा करताय ? आधी आपल्या जबाबदाऱ्या जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा

Accident: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Goodbyes are never easy! ऋषभ पंतची पोस्ट व्हायरल; लिलावात २७ कोटी मिळाल्यानंतर नेमकं असं का म्हणतोय?

SCROLL FOR NEXT