photo 
मराठवाडा

पवित्रेश्वर मंदिर परिसर नटला हिरवळीने 

राजेश दारव्हेकर

हिंगोली: पोतरा (ता. कळमनुरी) येथील पवित्रेश्वर महादेव मंदिराच्या माळरानावरील कडूनिंबाचे वन व बालउद्यान भाविकांसह बच्चे कपंनीचे आकर्षण ठरत आहे. हा परिसर हिरवळीने नटला आहे. त्यामुळे परिसरातील शाळा, महाविद्यालयांच्या सहली येथे दाखल होत असून येथील प्रतिध्वनींचा आनंद लुटण्यासाठी युवकही गर्दी करत आहेत.

पोतरा(ता. कळमनुरी) येथे पवित्रेश्वर महादेव मंदिराचा ८५ एकरचे माळरान आहे. या माळरानावर पक्षाच्या विष्टेपासून कडूनिंबाची चार ते पाच हजार झाडे निसर्गतः च तयारी झाली आहेत. त्‍याला कोटरी बिऱ्हाटीच्या रोपट्यांचे सरंक्षण झाले आहे. तसेच गावकऱ्यांनी येथे कुऱ्हाड बंदी, गुराई बंदी, चराई बंदी आदी उपक्रम राबविल्याने वृक्षसंवर्धनास मदत झाली आहे. तसेच सामाजिक वनिकरण विभागातर्फे रोपट्यांचे संगोपन केल्याने रोपट्यांचे रुपांतर झाडात झाले आहे.

विविध वन्यप्राण्यांचे वास्तव्य

 येथे अनेक प्राणी वास्‍तव्यास येत आहेत. यात मोर, ससे, कोल्‍हे या प्राण्याची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या या माळरानावर सामाजिक वनिकरण विभागातर्फे चार हजार रोपट्यांची लागवड करण्यात आली असून बोअरवेल घेवून ठिबकद्वारे प्रत्‍येक रोपट्यांना पाणी दिले जात आहे. त्‍याच्या देखभालीसाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच माळरानावर जाण्यासाठी गट्टूच्या पायऱ्या, विसाव्यासाठी निवारे, कडूनिंबाच्या वृक्षाच्या बुडाला ओटे तयार करण्यात आले आहेत. 

बालउद्याने ठरतेय आकर्षण

येथे लावण्यात आलेल्या वृक्षात वड, आंबा, चिंच, निंब, चिकू, बदाम आदी जातींच्या वृक्षांसह विविध फळ व फुलांच्या झाडांचा समावेश आहे. पवित्रेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे सध्या हे वन आकर्षण ठरत आहे. तसेच येथे बच्चे कंपनीसाठी सामाजिक वनिकरण विभागातर्फे बालउद्यान उभारण्यात आले आहे. यामध्ये विविध प्राण्यांच्या प्रतिकृती, घसरगुंडी, लॉन, बच्चे कंपनीसाठी असलेले खेळाचे साहित्यांचा समावेश आहे. त्यामुळे येथे भाविकांसह पर्यटकांची संख्या वाढली आहे. 

शाळा, महाविद्यालयाच्या सहली दाखल
 
परिसरातील शाळा, महाविद्यालयातील सहल येथे दाखल होत असून या माळरानावरून मोठा आवाज काढल्यानंतर त्‍याचा प्रतिध्वनी ऐकावयास मिळत आहे. प्रतिध्वनी ऐकण्यासाठी अनेक युवक येथे गर्दी करत आहेत. वृक्षसंवर्धनामुळे परिसरातील विहीरी व विंधन विहीरीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. तसेच जमिनीपासून महादेव मंदिर व उद्यानाचा भाग उंच टेकडीवर आहे. तरीही बोअरवेलची पाणी पातळी समाधान कारक आहे.

निसर्गरम्‍य परिसर पाहण्यासाठी गर्दी

पवित्रेश्वर महादेवाच्या माळरानावर वन तयार झाले आहे. यासाठी सामाजिक वनिकरण विभागाने पुढाकार घेतला असून हे उद्यान पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. अनेक शालेय सहली दाखल होत आहेत. तसेच निसर्गरम्‍य परिसर पाहण्यासाठी देखील मोठी गर्दी होत आहे.
-विजय मुलगीर, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT