Baburao Survase sakal
मराठवाडा

Umarga News : उमरग्यातील एक व्यक्ती ओढ्यातील पाण्यात गेला वाहून! २४ तासानंतरही शोध लागेना, तरुणांनी वाचवला एकाचा जीव

उमरगा शहरातील रहिवाशी बाबुराव तुळशीराम सुरवसे गावालगत असलेल्या शेतातील घराकडे दुचाकीवरून जाताना पाण्यात गेले वाहुन.

अविनाश काळे

उमरगा, ता. (जि. धाराशिव) - उमरगा शहरातील महादेव गल्लीतील रहिवाशी बाबुराव तुळशीराम सुरवसे (६०-वर्ष) गावालगत असलेल्या शेतातील घराकडे दुचाकीवरून जाताना पाण्यात वाहुन गेले आहेत. तर एका तरुणाचा जीव वाचवण्यात आला आहे.

उमरगा भागात प्रचंड पाऊस झाल्याने कोरेगाव तलाव ओसंडून वहात असल्याने उमरगा-कोरेगाव रस्त्यावरील ओढ्यातुन पाण्याचा मोठा प्रवाह सुरू होता. गुरूवारी रात्री पुलावर साधारणतः एक फुट पाणी वहात असताना सेवानिवृत्त कर्मचारी बाबुराव सुरवसे पुलाच्या जवळच असलेल्या स्वतःच्या घरातुन पाऊस थांबल्यानंतर शहरात आले होते.

शहरातील कामे आटोपुन ते स्कुटीवरुन परत घराकडे जात असताना पुलावरुन पाणी थोडे जास्त होते. दरम्यानच्या वेळेत शितल स्वामी हा तरूण बुलेट वरुन आला. दोघेही पाण्यातुन जाण्याचा प्रयत्न करत असताना पुढे पाणी जास्त असल्याचे लक्षात आले. दोघांचे संभाषणही झाले. इतक्यात बाबुराव सुरवसे दुचाकीवरुन खाली पडले, त्यांचा धोका लक्षात येताच शितल बुलेटवरुन खाली उतरला नाही.

या घटनेची माहिती मिळताच दत्ता शिंदे, शिवा बिराजदार, भिम शिंदे, राहुल शिंदे, सुरज पाटील, उमाकांत भातागळे, बाळू मुटले, सोनू जवळगे आदींनी दोरखंड टाकुन शितलला सुखरूप बाहेर काढले. त्या वेळी शितलने बाबुराव पाण्याच्या प्रवाहाबरोबर गेल्याची माहिती सांगितली. रात्री उशीरापर्यंत महादेव गल्ली, शिंदे गल्लीतील तरुण व पोलिसांनी शोधाशोध करण्याच्या प्रयत्नाला यश आले नव्हते.

दरम्यान शुक्रवारी (ता. चार) सकाळपासुन पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या मार्गदशनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला. दुपारी बारा वाजता धाराशिवच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने शोध कार्याला सुरवात केली होती. सायंकाळी सहापर्यंत तर शोध लागला नव्हता. उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार गोविंद येरमे, पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक तुळशीदास वराडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लबूशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT