Phulambri Market Committee erns 74 lakhs of income of during a year net profit of Rs 34 lakhs rak94 
मराठवाडा

Phulambri Market Committee : वर्षभरात फुलंब्री बाजार समितीचे 74 लाखाचे उत्पन्न; 34 लाख रुपयाचा निव्वळ नफा

फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती पदाचा पदभार अनुराधा चव्हाण यांनी घेऊन कारभार हाती घेतला होता.

नवनाथ इधाटे

फुलंब्री,ता.२४(बातमीदार) : फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समिती वर्षभरापूर्वी निवडणुकीच्या काळात ठणठणाट झाली होती. मात्र वर्षभरापूर्वी बाजार समितीच्या सभापती पदाची धुरा अनुराधा अतुल चव्हाण यांनी स्वीकारल्यानंतर वर्षभरातच 74 लाख रुपयांचे उत्पन्न बाजार समितीने मिळविले आहे. त्यात कर्मचाऱ्यांच्या पगारासह प्रशासकीय खर्च जाऊन 34 लाख 21 हजार रुपयाचा निव्वळ नफा आज बाजार समितीकडे आहे. दरम्यान बाजार समितीने स्वमालकीचे नवीन वाहन खरेदी केले आहे.

फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती पदाचा पदभार अनुराधा चव्हाण यांनी घेऊन कारभार हाती घेतला होता. त्यास आज एक वर्ष पूर्ण झाले. त्यावेळी बाजार समितीकडे केवळ 38 हजार 210 इतकी रक्कम शिल्लक होती. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार हरिभाऊ बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती अनुराधा चव्हाण व सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने आपल्या खास कार्य कौशल्याची छाप पाडत बाजार समितीस आर्थिक तोट्यातून काटकसरीने व आर्थिक शिस्तीचा पाया मजबूत केला.

शेतक-यांच्या हिताच्या संस्था मोठ्या झाल्या पाहिजे. या ध्येयाने झपाटून काम करीत एका वर्षात बाजार समितीस 74 लाखाचे उत्पन्न मिळवित कर्मचाऱ्यांचे नऊ महिन्याचा पगार व प्रशासकीय खर्च यावर चाळीस लाख पंधरा हजार रुपये खर्च करण्यात आले. उर्वरित 34 लाख 21 हजार रुपये बाजार समितीला आजच्या स्थितीत निव्वळ नफा आहे. त्यामुळे बाजार समितीच्या स्वमालकीचे महिंद्रा बोलेरो वाहन खरेदी करून विधिवत सर्व मान्यवर संचालकांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले.यावेळी बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय करपे, संचालक सुहास शिरसाठ, शिवाजीराव पाथ्रीकर, अप्पासाहेब काकडे, विवेक चव्हाण, योगेश जाधव, माधवराव जाधव, सर्जेराव मेटे, राजेंद्र ठोंबरे, श्रीराम म्हस्के, अजहर सय्यद, सचिव मनोज गोरे व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

बाजार समितीच्या उत्पन्नाचे स्रोत निर्मिती अंतिम टप्प्यात

सध्या बाजार समितीस स्वउत्पन्नाचे स्त्रोत निर्मितीच्या काही महत्वाच्या प्रकल्पावर हि काम काम सुरु करण्यात आले आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उभारणीच्या मूळ शेतकरी हिताच्या धोरणांसाठी व शेतकरी बांधवांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला अधिक भाव देण्यासाठी व त्याचबरोबर युवक व युवतीच्या रोजगार निर्मितीसाठी पायाभूत सुविधा व प्रकल्प उभारणीसाठी प्रशासकीय मान्यता व आर्थिक संस्था या विषयाचे काम अंतिम टप्प्यावर असून या कार्यास प्रत्यक्ष लवकरच मूर्तस्वरूप येणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या मालकीची असून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळवून देत बाजार समितीच्या उत्पन्नाच्या स्रोतात वाढ करणे यावर काम केले जात आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व आमदार हरिभाऊ बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीने 74 लाखाचे उत्पन्न वर्षाखाली मिळविले आहे. यात खर्च वगळून 34 लाख रुपयांचा निव्वळ नफा बाजार समितीने कमवून नफ्यात आणली आहेत.

- अनुराधा चव्हाण, सभापती बाजार समिती फुलंब्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Updates : अनिल देशमुख हल्ला प्रकरणाचं AI रिक्रिएशन; विशेष पोलिस महानिरिक्षकांची माहिती

IND vs AUS Viral Video: सर्फराजची कॅचवरून विराट कोहलीने उडवली खिल्ली; ऋषभ पंत तर हसून लोटपोट झाला

Assembly Election 2024 : एसटी बस निवडणूक कर्तव्यावर... प्रवासी स्टॅण्डवर, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचा खोळंबा

Pune Crime : प्रेमसंबंधास नकार; समाज माध्यमावर अश्लील छायाचित्रे टाकून मित्राकडून तरुणीची बदनामी

SCROLL FOR NEXT