पैठण ते छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याची ही पाचवी घटना आहे.
-रविंद्र गायकवाड
बिडकीन : पैठण ते छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा (Water Supply) करणारी ७०० मि.मी'ची सर्वात जुनी असलेली जलवाहिनी आज (ता. ४) पहाटे पाच वाजेपासून फुटली असल्याची माहिती समोर आली आहे. पैठण ते छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याची ही पाचवी घटना असून वारंवार जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
तर, शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी मोठा विलंब होत आहे. फुटलेल्या जलवाहिनीच्या ठिकाणी स्थानिक फारोळा जलशुद्धीकरण केंद्र येथील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी करून वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. वारंवार जुनी पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटत असून याबाबत कुठलाही निर्णय प्रशासन घेत नसल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
७०० मिमी'ची ही पाइपलाईन फुटल्याने पाणी वाया जात असून तब्बल पाच तासांपेक्षा जास्त वेळ पाइपलाईन दुरुस्ती करिता लागणार असल्याचा अंदाज कर्मचाऱ्यांनी वर्तविला आहे. अद्याप वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली नाही.
छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने सह्योगनगर, प्रकाशनगर आणि खासगी कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. तसेच नवीन पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीच्या नालीत ही पाणी साचले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.