PM narendra modi 
मराठवाडा

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

PM narendra modi in Dharashiv: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी धाराशिवमध्ये आज सभा घेतली.

कार्तिक पुजारी

धाराशिव- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी धाराशिवमध्ये आज सभा घेतली. यावेळी मोदी यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसचं सरकार शेतकऱ्यांच्या वाट्याचे पैसे पळवायचं. युरिया खतासाठी शेतकऱ्यांना लाठ्या खाव्या लागल्या, असं मोदी सभेत म्हणाले आहेत. (PM narendra modi in Dharashiv)

काँग्रेसची नजर आता तुमच्या पैशावर पडली आहे. गरिबांची एकच इच्छा असते की त्यांनी कमावलेली संपत्ती आपल्या मुलांकडे जावी. पण, आता काँग्रेस तुमच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहे. काँग्रेसच्या एका फिलॉसॉफरने एक घोषणा देखील करुन टाकली आहे. जे स्त्रीधन आहे, मंगळसूत्र आहे ते आता तुमचे राहणार नाही. ते एक्स रे करण्याची भाषा करत आहेत,असं म्हणत मोदींनी टीका केली.

तुमच्या घरावर छापा टाकून अर्धी संपत्ती लुटण्याचा त्यांचा इरादा आहे. काँग्रेस महिलेचे मंगळसूत्र, दागिने हिसकावण्याची तयारी करत आहे. भारताच्या वारशाचा देखील काँग्रेसला तिटकारा आहे. देशभरातील भक्त प्रभू-रामाच्या दर्शनासाठी जात आहेत. पण, काँग्रेस , खोटी शिवसेना आणि खोटी राष्ट्रवादी निमंत्रण असून दर्शनाला गेली नाही. अशा लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का, असा सवाल मोदींनी केला.

भारताच्या स्वाभिमानाची ही निवडणूक आहे. तुम्ही दहा वर्षांपूर्वीचा भारत पाहिला आहे अन् आताचा भारत पाहात आहात. आज जग भारताला ओळखत आहे. गगनयानला अंतराळात पाठवण्याची तयारी करणाऱ्या भारताला जग ओळखत आहे. कोट्यवधी लोकांचा कोरोना काळात जीव वाचवणाऱ्या भारताला जग ओळखत आहे, असं मोदी म्हणाले.

काँग्रेसच्या काळात दहशतवादी हल्ला करुन पळून जायचे. त्यावेळी काँग्रेस जगासमोर वाचवा म्हणून रडायची. कमजोर काँग्रेस सरकार बनवू शकत नाही. काँग्रेसने फक्त विश्वासघात केला आहे. शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्यात काँग्रेस अपयशी ठरली. मोदी समस्या टाळत नाही, समस्यांना भिडतो. घराघरात पाणी पोहोचवण्याचं मोदीचं मिशन आहे, असंही ते म्हणाले.

अमेरिकेतला किस्सा

अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी मला येण्याचं निमंत्रण दिलं. व्हाईट हाऊसमध्ये जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मी भारताचा पहिला पंतप्रधान होतो, ज्याच्यासाठी इतका मोठा सोहळा ठेवण्यात आला होता. राष्ट्रपतींनी त्या रात्री सर्वांच्या टेबलवर ज्वारीचा (मिलेट) पदार्थ ठेवला होता. सुपरफूड म्हणून याची ओळख जगभरात होत आहे. मी दिवसरात्र काम करत आहे. तुमचं जीवन मला बदलायचं आहे, असं मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Ambernath Assembly Election 2024 Result Live: अंबरनाथमध्ये बालाजी किणीकरांचा विजयी चौकार; शिवसेनेचे राजेश वानखेडे चितपट

SCROLL FOR NEXT