photo 
मराठवाडा

रात्रीच्या अपघातांची पोलिसांना धास्ती

विनायक हेंद्रे

आखाडा बाळापूर (जि.हिंगोली) : हिंगोली - नांदेड मार्गावरील आखाडा बाळापूर ते वारंगा फाटा (ता. कळमनुरी) दरम्यान पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने उलटण्याचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही. यामध्ये वाहनांचे नुकसान तर होतच आहे, त्यासोबतच वाहने हटविण्यासाठी पोलिसांच्याही खिशाला चाट बसू लागली आहे. रात्रीचा फोन आल्यानंतर पुन्हा एखादे वाहन उलटले की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे आखाडा बाळापूर पोलिसांसाठी डोकेदुखी बनली आहेत.

आखाडा बाळापूर ते वारंगा फाटा मार्गावर मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविणे कठीण बनले आहे. रात्रीच्या वेळी अपघात होऊ लागले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या मार्गावरून वाहने चालवण्यासोबतच पायी चालणेदेखील जीवघेणे बनले आहे. काही दिवसांपूर्वी हदगाव तालुक्यातील एका व्यक्तीला वाहनाने धडक दिल्यामुळे जीव गमवावा लागला. 

दीड महिन्यामध्ये ११ ट्रक उलटले

विशेष म्हणजे खड्डे चुकवताना होणारे अपघात रात्रीच्या वेळी होऊ लागल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प होत आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना रात्री-बेरात्री घटना स्थळावर जावे लागत आहे. मागील दीड महिन्यामध्ये ११ ट्रक उलटले असून वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय वाहतूक सुरळीत करण्यासाठी लागणारी क्रेन व इतर मनुष्यबळ आणण्यासाठी पोलिसांनाच पदरमोड करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे पोलिसांसाठी डोकेदुखी बनले आहेत. 

राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने दाखविली केराची टोपली

विशेष म्हणजे पोलिस विभागाने या मार्गावरील खड्डे बुजविण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला पत्र दिले आहे. मात्र, या पत्राला राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने केराची टोपली दाखविली आहे. खड्डे बुजविण्याचे काम अद्यापही सुरू न झाल्यामुळे वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे वाहनधारकांसाठी डोकेदुखी बनले असले तरी पोलिसांच्या खिशालाही चाट बसविणारे ठरले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी भ्रमणध्वनी आल्यानंतर पोलिसांच्या अंगावर काटा उठत आहे.

जीव घेतल्यानंतरच खड्डे बुजविणार का?

हिंगोली - नांदेड मार्गावर जिल्हा हद्दीमध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे काही अंतर रस्ता चांगला आहे. त्यानंतर मध्येच खड्डे पडले आहेत. वाहन जवळ जाईपर्यंत खड्डा दिसत नाही. त्यात खड्डे जवळपास अर्धा फुटापर्यंत खोल असल्याने चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटत आहे. यामध्ये वाहने उलटण्याचे प्रकार घडत आहे. वाहने उलटण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. तरीही खड्डे बुजविण्यास मुहूर्त मिळत नसल्याचे दिसत आहे. खड्डे बुजविण्यासाठी आता एखादा मोठा अपघात होण्याची व त्यात काहींचा जीव जाण्याची वाट पाहिली जात आहे की काय ? असा संतप्त सवालही केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: राज्यात 38 जागांवर मुस्लिम लोकसंख्या जास्त; मतदारसंघात भाजपचीच सरशी, विक्रमी जागा जिंकल्या

IND vs AUS 1st Test : 8 Runs, 3 Wickets! यशस्वी जैस्वालच्या विकेटनंतर भारताचा डाव गडगडला; ऋषभ पंत, ध्रुव जुरेल ठरले अपयशी

Gas Tanker Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वारजे पुलाजवळ गॅस टँकर पलटी; मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प

Nashik Assembly Election 2024 Result : नाशिकमध्ये महिला आमदारांची पुनरावृत्ती; जिल्ह्यात 196 उमेदवारांपैकी 20 महिला

Assembly Elections 2024 : पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांची बाजी

SCROLL FOR NEXT