Mahadev Jankar  
मराठवाडा

Mahadev Jankar Interview: शरद पवारांसोबत सकारात्मक चर्चा, तरी महायुतीसोबत का गेले? जानकरांनी अगदी स्पष्ट सांगितलं

RSP Mahadev Jankar News: परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या विरोधात महाआघाडीचे संजय जाधव यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

परभणी- लोकसभा निवडणुकीचे देशभरात वातावरण आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरु झाली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या विरोधात महाआघाडीचे संजय जाधव यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळचे प्रतिनिधी अमित उजागरे यांनी महादेव जानकर यांच्याशी संवाध साधला. महायुतीसोबत जाण्याचा निर्णय त्यांनी का घेतला याबाबत जानकरांनी माहिती दिली आहे.( Parbhani Lok Sabha Election 2024)

शरद पवारांच्या भेटीमागचं कारण काय होतं?

राजकारणात कोण कुणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो. सुरुवातीला आपली झोपडी शाबूत ठेवण्याचा माझा प्रयत्न होता. भाजपमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे आल्यामुळे त्यांच्यातच जागेसाठी स्पर्धा सुरु होती. त्यामुळे मला जागा मिळेल का नाही याची खात्री नव्हती. त्यामुळे मी माढा, बारामती, परभणी,सांगली, दक्षिण नगर आणि उत्तर प्रदेशातील मिर्झापूर मतदारसंघात तयारी केली होती. याठिकाणी दोन वर्षांपासून मी काम सुरु केलं होतं.

मी महायुतीला सांगितलं होतं आम्हाला दोन जागा द्या आणि महाआघाडीला सांगितलं होतं तीन जागा द्या. महाआघाडीमध्ये शरद पवार यांनी जागा देतो म्हणून सांगितलं होतं. दोन-तीनवेळा चर्चा झाली होती. काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंनी आम्हाला प्रतिसाद दिला नव्हता. महायुतीमध्ये तिघेही आमच्या संपर्कात होते. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रपणे मला सांगितलं की, आम्ही एक जागा तुम्हाला देऊ. भाजपने राष्ट्रवादीला जागा दिली, राष्ट्रवादीच्या कोट्यातून मला परभणीची जागा देण्यात आली.त्यामुळे मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, असं जानकरांनी स्पष्ट केलं.

परभणीच का निवडलं?

परभणीच्या जनतेने गेल्या २० वर्षांपासून प्रेम केलं आहे. जेव्हा मी २००३ ला पक्ष काढला तेव्हा माझा पहिला रिझल्ट परभणीने दिला. अडचणीच्या काळात माझा आमदार देखील परभणीने दिला. जनाबाईंची भूमी असल्याने मला परभणीच्या जनतेबाबत प्रेम आहे. १९९७ साली मी परभणीमध्ये आलो होतो. केडर कँम्प जे प्रशिक्षण पहिलं घेतलं गेलं त्यातच मी शिकलो आहे. त्यात शेतकरी कामगार पक्ष, बहुजन पक्षाची काही माणसं होती. परभणीबाबत मला एक आकर्षण होतं त्यामुळे मी परभणीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, असं जानकर म्हणाले.

गोपीनाथ मुंडे यांचा सिंहाचा वाटा

माझी जी आता किंमत वाढली आहे त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा सिंहाचा वाटा आहे. माझा छोटा पक्ष होता. मोठे पक्ष छोट्या पक्षाला युतीमध्ये घेत नाहीत. पण, त्यांनी मला युतीमध्ये घेतलं अन् मला किंमत दिली. मला त्यांनी मुलगा मानलं. ते म्हणाले की माझा राजकीय वारस महादेव जानकर आणि पैशांचा वारसा मुलींकडे असेल. पण, मला आनंद आहे की बहीणपण बीडमधून निवडून येईल. मुंडेंबाबत माझ्या मनात हळवी बाजू आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यात मी कधीही दुरावा येऊ देणार नाही, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार , GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT