Beed News  sakal
मराठवाडा

Beed News : आरोग्य यंत्रणा सलाइनवर; ग्रामीणमध्ये कामांसोबतच वाढली रिक्त पदांची संख्या

जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्य यंत्रणेत निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे रिक्त पदांची व मंजूर पदांची संख्या ही २०११ च्या लोकसंख्येच्या तुलनेत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण आरोग्य यंत्रणेत ८५३ पदांपैकी केवळ ३७२ पदे भरली आहेत. तर, ४८१ पदे रिक्त आहेत.

सकाळ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्य यंत्रणेत निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे रिक्त पदांची व मंजूर पदांची संख्या ही २०११ च्या लोकसंख्येच्या तुलनेत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण आरोग्य यंत्रणेत ८५३ पदांपैकी केवळ ३७२ पदे भरली आहेत. तर, ४८१ पदे रिक्त आहेत. साधारण ३० लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात ५० प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अडीचशेवर उपकेंद्र आहेत. अलीकडे प्राथमोपचारासह आरोग्य विभागाकडून रोज नवनवे उपक्रमांची घोषणा केली जाते.

लसीकरण, गर्भवती स्त्रियांच्या भेटी गरोदर मातांची नोंदणी, लसीच्या मात्रा व कॅल्शिअम गोळ्या, वजन, उंची, एचबी, शुगर, लघवी आदी तपासण्या, गृहभेटी करुन त्यांचे कार्ड अद्ययावत करणे, शून्य ते १६ वर्षापर्यंतच्या बालकांचे लसीकरण, क्षयरोग, कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम, कुटुंब कल्याण कार्यक्रमांची उद्दिष्टपूर्ती, जंतनाशक मोहीम, १८ वर्षांवरील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी, जन्म नोंद, मृत्यू नोंदीबाबत आशांची बैठक, ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी, ॲनिमिया मुक्त भारत, अभियान, एनसीडी तसेच आयुष्मान भव कार्यक्रम, साथ रोग सर्वेक्षण, जननी सुरक्षा व प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना अशी शेकडो उपक्रमांची अंमलबजावणी ग्रामीण आरोग्य यंत्रणेमार्फत केली जाते.

या सर्व कामांसाठी केवळ ३७२ कर्मचारी कार्यरत आहेत. विशेष म्हणजे अलीकडे आरोग्य सेविकांना डाटा एंट्रीसारख्या तांत्रिक व झंजटीच्या कामाचाही भार पडत आहे. आरसीएच ऑनलाइन करणे, एचएमआयए, एचआयएस ऑनलाइन करणे, युवीन पोर्टलला नियमित लसीकरण ऑनलाइन करणे, आभा हेल्थ कार्ड ऑनलाइन काढणे, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचे फॉर्म ऑनलाइन व्हेरिफाय करणे, अशी डाटा एंट्री कामेही या संवर्गावर लादली जात आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम आणि कर्मचाऱ्यांवर ताण असल्याचे बोलले जात आहे.

शासनाकडून पदभरतीची प्रक्रीया सुरु आहे. पदे रिक्त असले तरी कर्मचारी झोकून देऊन कामे करतात. म्हणूनच नुकतेच सुंदर माझा दवाखाना अभियानात एक आरोग्य केंद्रासह पाच उपकेंद्रांना बक्षीसे मिळाली. चांगली सेवा देण्यासाठी सर्व टिम काम करते.

— डॉ. उल्हास गंडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, बीड

पाच हजारांमागे एक सेविका नावालाच

जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाखांच्या घरात आहे. तर, आरोग्य सेविकांची संख्या केवळ १७१ आहे. पाच हजार लोकसंख्येमागे एक आरोग्य सेविका असावी, असा राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेचा दंडक आहे. मात्र, जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र तर २९७ उपकेंद्र असून आरोग्य सेविकांची संख्या १७१ आहे.

विशेष म्हणजे या संवर्गातील तब्बल ३२४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे १७,५०० लोकांमागे केवळ एक सेविका आहे. आरोग्य सेविकांची ५५ ते ६० टक्के रिक्त पदे हे राज्यातील सर्वत्र चित्र आहे. विशेष म्हणजे २०११ च्या लोकसंख्येच्या आधारावर ही पदे मंजूर आहेत. लोकांवर प्रथमोपचार करणाऱ्या आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत या आरोग्य सेविकांची नेमणूक असते. मात्र, हळूहळू या संवर्गावरील कामांचा भार वाढला आणि पदांची संख्या घटत गेली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT