उमरगा (जि.उस्मानाबाद) : खासदार ओमराजे निंबाळकर हे माजी खासदार रविंद्र गायकवाड यांच्या गाडीत कार्यक्रमास्थळी आल्याचे चित्र उपस्थितीतांना आश्वर्याचे वाटत होते. 
मराठवाडा

उस्मानाबादचे आजी-माजी खासदार एकत्र! चर्चेला उधाण

अविनाश काळे

माजी राज्यमंत्री बसवराज पाटील आणि माजी खासदार गायकवाड या दोन मातब्बर नेत्यांचे वलय गेल्या तीन दशकापासून राजकारणात आहे. मात्र उमरगा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यानंतर दोघांनी राजकारणात स्थैर्य निर्माण करण्यासाठी पर्याय शोधला.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्यात शिवसेनेचे Shiv Sena जाळे निर्माण केलेले माजी खासदार रविंद्र गायकवाड Former MP Ravindra Gaikwad यांना गत लोकसभा निवडणुकीत पक्षाअंतर्गत डावपेचामुळे उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर ते दुखावले आणि काही नाराज शिवसैनिकांनी उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झालेले ओमराज निंबाळकर MP Omraje Nimbalkar यांच्यावर अप्रत्यक्षपणे उघड नाराजी व्यक्त करत निवडणूकीत धरसोड भूमिका घेतली. निवडणूकीपासुन एकमेकापासून दूर असलेले आजी - माजी खासदार रविवारी (ता.१३) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे Enironment Minister Aditya Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकत्र आल्याने पक्ष कार्यकर्त्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. मात्र ते मनापासून खरोखरच एकत्र आले आहेत का ? अशी चर्चा होते आहे. उमरगा - लोहारा तालुक्याच्या राजकारणात शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे प्राबल्य आहे. माजी राज्यमंत्री बसवराज पाटील आणि माजी खासदार गायकवाड या दोन मातब्बर नेत्यांचे वलय गेल्या तीन दशकापासून राजकारणात आहे. मात्र उमरगा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यानंतर दोघांनी राजकारणात स्थैर्य निर्माण करण्यासाठी पर्याय शोधला. श्री. पाटील यांनी औसा विधानसभा, तर श्री. गायकवाड यांनी उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत यश मिळविले. गत लोकसभा निवडणूकीत Lok Sabha Election श्री.निंबाळकर यांनी उमेदवारी मिळविण्यात बाजी मारली खरी, मात्र उमरगा Umarga - लोहारा Lohara तालुक्यातील अस्वस्थ पक्ष कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी तत्कालिन मंत्री अर्जुन खोतकर Former Minister Arjun Khotkar यांना उमरग्यात यावे लागले होते. श्री.निंबाळकर यांचे जवळचे नातेवाईक बाबा पाटील यांनी आपल्या परीने निवडणूकीत मदत केली. शिवाय भाजप आणि शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या मतदारांची साथ श्री.निंबाळकर यांना मिळाली. या अंतर्गत राजकारणात आमदार ज्ञानराज चौगुले यांना तारेवरची कसरत करावी लागली होती. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतरच्या दोन वर्षात श्री.गायकवाड, खासदार ओमराजे एकत्र येत नव्हते. मात्र रविवारी पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात दोघे एकत्र आले होते. श्री.गायकवाड यांच्याबद्दल आदर व्यक्त करत खासदार निंबाळकर, आमदार चौगुले आणि कळंबचे आमदार कैलास पाटील चौघेही श्री.गायकवाड यांच्या वाहनात कार्यक्रमास्थळी आल्याचे चित्र उपस्थितीतांना आश्वर्याचे वाटत होते.Present MP Omraje Nimbalkar And Former Ravindra Gaikwad Come Together In Umarga

किरण गायकवाड राजकारणात सक्रिय

श्री.गायकवाड यांचे सुपूत्र किरण गायकवाड राजकारणात सक्रिय झाले आहेत. राजकारणातील यश- अपयशाची कारणमीमांसा त्यांना चांगलीच ठाऊक झाल्याने ते पक्षाच्या विविध कार्यक्रमासह विकास कामासाठी सक्रियपणे काम करताहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कार्याला तोड नाही. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची फळी भक्कम करत ते आगामी राजकारणातील स्थैर्यासाठी झटत असल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT