dharashiv sakal
मराठवाडा

मराठवाड्याच्या सुपुत्राला एकाच दिवशी दोन पेटंट मंजूर

धाराशिवच्या संशोधकाचा भारत सरकारकडून सन्मान

सुधीर कोरे

जेवळी, ता. लोहारा जि. धाराशिव : संशोधक प्रा.सिद्रामप्पा धारणे यांना एकाच दिवशी भूजल पुनर्भरणाची सोपी व प्रभावी पद्धत तसेच आरसीसी घटकांच्या भार वहन क्षमतेत वाढ या दोन संशोधनाला भारत सरकारने पेटंट मंजूर केले आहेत. हे संशोधन अतिशय उपयुक्त आहेत. यापूर्वी त्यांच्या विविध क्षेत्रातील संशोधनासाठी एकूण चौदा पेटंट मंजूर झाले आहेत. चौदा पेटंट मंजूर झालेले या भागातील ते एकमेव संशोधक असून या बाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जेवळी येथील रहिवासी असलेले प्रा. सिद्रामप्पा शिवाशंकर धरणे हे एम.ई. सिव्हिल असून त्यांनी 'गेट' परिक्षा ही तीन वेळा उत्तीर्ण राहिले आहेत. त्यांचे आज पर्यंत एकूण ६५ पेटंट नोंदणीकृत आहेत. या पैकी ६२ पेटंट प्रकाशित झाले असून यातील आतपर्यंत एकूण चौदा संशोधनाला भारत सरकारकडून पेटेंटची मंजूरी मिळाली आहे. चौदा पेटंट मंजूर झालेले या भागातील ते एकमेव संशोधक आहेत. या व्यतिरिक्त विविध क्षेत्रातील त्यांचे ३६ शोध निबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत. या यशाबद्दल विविध पंधरा पुरस्कार देण्यात झाले आहे.

याव्यतिरिक्त २०१७ मध्ये यू.ए.ई. या देशाकाडून 'वॉटर अँड एनर्जी एक्सलन्स अवॉर्ड' ने सन्मानित करण्यात आले आहे. मंगळवार (ता.२६) एकाच दिवशी भूजल पुनर्भरणाची सोपी व प्रभावी पद्धत तसेच आरसीसी घटकांच्या भार वहन क्षमतेत वाढ या दोन संशोधनाला भारत सरकारने पेटंट मंजूर केला असून याबाबतचा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत. या यशाबद्दल या युवा संशोधकाच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सोपी आणि प्रभावी भूजल पुनर्भरण पद्धतीद्वारे सध्याच्या पारंपारिक प्रक्रियेतील सर्व त्रुटी ही दूर करते. या पध्दतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भूजल पातळी अधिक वेगाने वाढविली जाऊ शकते. या व्यतिरिक्त हे किफायतशीर असून शिवाय संपूर्ण राष्ट्र आणि जगाला पूर नियंत्रण आणि पाण्याची शाश्वतता प्रदान करते. याबरोबरच वेगवेगळ्या क्रॉस सेक्शनल आकारांसह सौम्य स्टील रीइन्फोर्सिंग बार वापरून आरसीसी घटकांच्या भार वहान क्षमतेत वाढ हे बांधकाम तंत्र बांधकाम क्षेत्रात अतिशय किफायतशीर आणि प्रबलित सिमेंट कॉंक्रिटपासून बनवलेल्या सर्व घटकांची ताकद सुधारू शकते अशी माहिती प्रा. सिद्रामप्पा धरणे यांनी सकाळशी बोलताना दिली आहे.

प्रा. सिद्रामप्पा शिवशंकर धरणे यांना विविध क्षेत्रातील संशोधनासाठी भारत सरकारकडून आतापर्यंत एकूण चौदा पेटंट मिळाले आहेत. यापुर्वी त्यांच्या १) आरसीसी आणि फेरोसमेंट बबल डेक स्लॅब, २) मुख्य सर्पिल मजबुतीकरणासह भूकंप प्रतिरोधक वर्तुळाकार स्तंभ, ३) सौर पॅनल्सवर उत्तल लेन्सच्या ॲरेज एम्बेड करण्याची पद्धत ४) पाणी गरम करण्यासाठी एक कार्यक्षम सोलर धर्मल रिसेप्टर ॲरे ६) स्पोर्ट्स बॅट विथ वेट एन्हान्समेंट कम-ॲडजस्टमेंट सिस्टीम, ६) भूकंप प्रतिरोधक फेरोसमेंट पोकळ स्तंभ आणि पोकळीच्या भिंती, ७) कंपोजिट आरसीसी/फेरोसमेंट ग्रिड स्लॅब, ८) कातरण मजबुतीकरण व स्टिरपसह बीम आणि स्तंभ, ९) भूकंप प्रतिरोधक ओव्हरहेड वॉटर टैंक, १०) कार्यक्षमता वाढवणे-सौर ड्रायर, ११) मजबुतीकरणांच्या वेगवेगळ्या आकाराच्या प्रोफाइलसह आरसीसी स्लॅबच्या वर्तनात सुधारणा १२) केळी, कमळाचा बुंधा, मुळ व तांदळाचा तनिस (काड्या) या टाकावू पदार्थांपासून पाण्याचे शुद्धीकरण या संशोधनास भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT