Laxman Hake  sakal
मराठवाडा

OBC reservation : अठरापगड जातींची मोट बांधावी : प्रा. लक्ष्मण हाके यांचे ओबीसी नेत्यांना आवाहन

OBC reservation : प्रा. लक्ष्मण हाके यांनी ओबीसी नेत्यांना अठरापगड जातींना एकत्र करून ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात उतरावे असे आवाहन केले. वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी त्यांनी उपोषण सुरू केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

वडीगोद्री : ‘ओबीसी नेत्यांनो न घाबरता आपल्या मताची भीती दाखवा, निवडणुकीत आपली ताकद दाखवा. अस्तित्व टिकविण्यासाठी घरात न थांबता बाहेर पडा, अठरापगड जातींना एक करा. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे तुम्हाला काम करावे लागेल. ‘ओबीसी आरक्षण बचाव’साठी आम्ही आमचा जीव हातावर घेतला आहे’, असे आवाहन प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले.

‘ओबीसी आरक्षण बचाव’साठी प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी येथे उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा मंगळवारी (ता. २४) सहावा दिवस होता. पत्रकारांशी बोलताना हाके म्हणाले, ‘राजरत्न आंबेडकर यांना मी ओळखत नाही. आम्ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे आहोत.

अंतरवाली सराटीचा रस्ता आम्ही अडवला नाही. तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शासनाने अडवला आहे. मनोज जरांगे यांनी त्यांना विचारावे. आरक्षणासाठी मराठा समाजातील काहींनी आत्महत्या केल्या आहेत. त्याला प्रमुख पक्ष, मराठा समाजाचे मुख्यमंत्री, आमदार, खासदार जबाबदार आहेत. अशा घटनांना ओबीसी आरक्षण जबाबदार नाही. आम्हाला आत्महत्यांच्या घटनांबाबत दु:ख आहे. मराठ्यांनी मराठ्यांसाठी मराठ्यांच्या करवी चालवलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. येथे ओबीसींचा विचार, विकास होत नाही.’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते शरद पवार, संभाजीराजे छत्रपती, अशोक चव्हाण, उद्धव ठाकरे, मनोज जरांगे आदींवर हाके यांनी टीका केली. धनगर समाजबांधवांना ‘एसटी’मध्ये आरक्षण देण्याबाबत बोला. ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही, हे शासनाने मीडियासमोर येऊन सांगावे असे ते म्हणाले.

पाठिंब्यासाठी समाजबांधवांची गर्दी

वडीगोद्री येथे हाकेसह त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस होता. त्यांना पाठिंब्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. दरम्यान, सोनियानगर (अंतरवाली सराटी) येथे ‘ओबीसी आरक्षण बचाव’साठी मंगेश ससाणे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव

Nashik Vidhan Sabha Election: मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जिल्ह्यात विक्रमी मतदान; 2009 च्या निवडणुकीत 60 टक्के, तर यंदा 69.12 टक्क्यांवर

आलिया कपडे बदलत असताना तो सतत तिच्यावर... इम्तियाज अली यांनी सांगितली ती घटना; म्हणाले- त्याला मी पाहिलं तेव्हा

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

SCROLL FOR NEXT