नांदेड : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात शुक्रवारी (ता.२० डिसेंबर २०१९) झालेल्या धरणे आंदोलनाला नांदेडमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रचंड संख्येने जमलेल्या आंदोलनकर्त्यांच्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. या धरणे आंदोलनात युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. पोलिसांच्या दक्षतेमुळे आंदोलन काही अपवाद वगळता शांततेत पार पडले.
केंद्र सरकारने नूतन नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केलाय. हा कायदा अन्यायकारक असल्याचा आरोप केला जात आहे. नांदेडमध्ये शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वच राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रमुख नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाषणे केलीत. नांदेडच्या आंदोलनात शहरातील चहूबाजूने नागरिक सहभागी झाले होते. त्यात सर्वाधिक युवकांचा सहभाग होता. हे धरणे आंदोलन सुरू असतानाच एक रुग्णवाहिका रेल्वे स्टेशनकडून आली असता आंदोलनकर्त्या युवकांनी तातडीने या रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देत संवेदनशीलता दाखवून दिली.
‘हमे चाहीये आझादी’, ‘यह देश हमारा है’ अशा घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमून गेला होता. आंदोलनामुळे पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त ठेवल्याने आंदोलन शांततेत पार पडले. दरम्यान, आजच्या या आंदोलनामुळे शहरातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. आज काही जागी अफवा पसरवण्याचे प्रकार देखील घडले, अफवा पसरवणाऱ्या या लोकांवर पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
आंदोलनातील ठळ्ळक नोंदी
०- काही मुस्लिम तरुणांनी पोलिस कर्मचाऱ्यांना गुलाबाचे फुल देवून स्वागत केले
०- नांदेड वकिल संघटनेतर्फेही जाहीर निषेध केला.
०- मराठा समाजाचाही आंदोलनात सहभाग
०- कॉंग्रेस पक्षातर्फे अब्दुल सत्तार यांचाही आंदोलनात सहभाग
०- नागरिकत्व कायदा रद्द करण्याची भंते पय्या बोधी यांची मागणी
०- गुरुनानक देवजींनी समानतेचा संदेश दिला आहे. त्यामुळे हा कायदा रद्द करावा अशी शीख समाजाच्या वतीने रवींद्र बुंगई यांनी मागणी केली.
०- मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.
०- लाल बावटातर्फे गंगाधर गायकवाड यांच्यासह सर्वच पक्षांतील प्रमुख नेते व पदाधिकार्यांनी यावेळी भाषणे केलीत.
हेही वाचलेच पाहिजे - Video : ‘या’ जिल्ह्यात सायबर क्राईम विभाग होणार गतिमान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.