फोटो 
मराठवाडा

महिलां व विद्यार्थीनींना ‘सुरक्षा पेन’ देणार

प्रल्हाद कांबळे

नांदेड : पोलीस विभागाकडून जागतिक महिला दिनानिमित्त आयोजीत ‘निर्भया वॉक’ दरम्यान ‘सुरक्षा पेन’चे वाटप करण्यात येणार आहेत. या पेनमध्ये पोलिस दलाच्या विविध क्रमांकाचा सहभाग असून पोलिसांना यातून लगेच माहिती मिळणार आहे. या पेनचा महिलां व विद्यार्थीनीनी उपयोग घ्यावा असे आवाहन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे. 

महिलांवर होणारे अत्याचार, मुलींची छेडछाड व प्रेम प्रकरणातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर होत असलेले प्राणघातक हल्ले लक्षात घेऊन, लैंगिक अत्याचार अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस दलात जलद माहिती मिळविण्या कामी ‘सुरक्षा पेन’ उपयुक्त असून सुरक्षा पेनमध्ये अत्याचारावर प्रतिबंधक करणेकामी महिला व मुलींसाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे नांदेड पोलिसांची तात्काळ मदत मिळणार आहे. नांदेड जिल्हा पोलिस दलातील हेल्पलाइन क्रमांक या पेनमध्ये दिलेले असून सदर पेनचा वापर व माहितीचा परिपूर्ण उपयोग घ्यावा असे आवाहन पोलीस अधीक्षक मगर यांनी केले आहे.


सुरक्षा पेनचे वैशिष्ट्य 
महिला व मुलींसाठी महत्त्वाच्या सूचना

- घराबाहेर पडताना घरातील व्यक्तींना सांगून जावे. कोणत्याही अनोळखी पुरुषास निर्जन ठिकाणी भेटणे टाळावे तसेच रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी जाणे टाळावे.
- त्याचप्रमाणे आपला कोणी पाठलाग किंवा पाळत ठेवत आहे. ओळख नसताना ओळख वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. असे आढळल्यास आपले प्राचार्य, घरच्यांना किंवा पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी.
- तोंडाला स्कार्फ बांधून फिरणे निदान रात्रीच्यावेळी टाळावे.
- आपला पत्ता, खासगी माहिती, फोन क्रमांक अनोळखी मुलांना किंवा इतर व्यक्तीस देणे टाळावे.
- मुलींनी आपल्या मैत्रिणी, मित्र यांचे नाव, फोन क्रमांक, पत्ता याविषयी पालकांना सविस्तर माहिती देऊन ठेवावी.
- एखाद्या मुलाकडून तुम्हाला प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष त्रास होत असल्यास लगेच आपल्या पालकांना, शिक्षकांना किंवा पोलिसांना कळवावे. त्यामुळे त्यावर कारवाई किंवा प्रतिबंध करणे शक्य होईल.
- व्हाट्सअप, फेसबुक व इतर सोशल मीडियाचा वापर करत असताना अनोळखी व्यक्तीचे फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारु नये, ओळख वाढवू नये तसेच त्यांना आपले पर्सनल फोटो शेअर करू नये.
- स्वतःचे पर्सनल फोटो सोशल मीडियावर अपलोड करीत असताना सिक्युरिटी सेटिंगमध्ये जाऊन आपले फोटो सिक्युअर करून घ्यावेत.

नांदेड जिल्हा पोलिस दलाचे हेल्पलाइन क्रमांक

- पोलीस मदत क्रमांक- 100 
- महिलांना तात्काळ मदत मिळण्यासाठी -10 91 /181
- लहान मुलांना तात्काळ मदत मिळण्यासाठी- 10 98 
- जनतेच्या तक्रारीसाठी व्हाट्सॲप क्रमांक -88 88 88 9255
- महिला सहाय्य कक्ष- 024 62 -240 431 
- पोलीस नियंत्रण कक्ष - 024 62 -234 720 
- महिला व बालकांसाठी सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी करिता- 15 560 यावर संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT