Radhika Tambe sakal
मराठवाडा

Radhika Tambe : नऊवारी साडीत योगासन करत पटकावली दोन सुवर्णपदके

सकाळ वृत्तसेवा

बीड - काठमांडू (नेपाळ) येथील दहाव्या इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत राधिका सचिन तांबे-घोलप या सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. २९ जूनला काठमांडूच्या बोगन विला हॉलमध्ये या स्पर्धा झाल्या. यात चऱ्हाटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील योगशिक्षिका राधिका तांबे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

राधिका यांनी पारंपरिक योगासन, रिदमिक एकेरी व दुहेरी प्रकारांत सहभाग घेतला. पारंपरिक योगासन स्पर्धेमध्ये त्यांना सुवर्णपदक, तर एकेरी रिदमिक या स्पर्धेमध्येही त्यांनी सुवर्णपदक पटकावले. त्यांनी एकेरी रिदमिक या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रीयन पारंपरिक नऊवारीमध्ये योगासने सादर केली.

महाराष्ट्राची संस्कृती नऊवारी परिधान करून आसनांचे सादरीकरण केले. स्पर्धा समन्वयक सुरेश गांधी यांनी त्यांना सहकार्य केले. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT