Latur Crime sakal
मराठवाडा

Latur Crime : बनावट गुटखा कारखान्यावर लातूरमध्ये छापा ; पोलिसांची कारवाई

येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील एका वेअर हाऊसमध्ये सुरू असलेल्या बनावट गुटखा तयार करण्याच्या कारखान्यावर सहायक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी छापा मारून तीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील एका वेअर हाऊसमध्ये सुरू असलेल्या बनावट गुटखा तयार करण्याच्या कारखान्यावर सहायक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी छापा मारून तीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. येथे झालेली ही अलीकडची सर्वात मोठी कारवाई आहे. या प्रकरणी सात जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलिस दलाकडून अवैद्य धंद्यांविरुद्ध कडक कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीमध्ये अवैधरीत्या बनावट गुटखा बनविण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक रेड्डी यांच्या पथकाला मिळाली. खात्री करून पोलिस पथकाने मंगळवारी (ता. २८) अतिरिक्त एमआयडीसीमधील कोंबडे ॲग्रो एजन्सी या वेअर हाऊसवर छापा मारला. त्यावेळी बनावट गुटख्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल (सुपारी, तंबाखू पावडर, मिक्सर, सीलिंग करणाऱ्या मशीन, ‘गोवा १०००’ असे छापील पॅकिंग साहित्य, बनावट गुटखा, एक ट्रक, एक पिकअप वाहन असा एकूण तीन कोटी पाच लाख ७३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रेड्डी, उपनिरीक्षक होनाजी चिरमाडे, उपनिरीक्षक राजेश घाडगे, हेडकॉन्स्टेबल विष्णू गुंडरे, पोलिस नाईक अनंतवाड, कॉन्स्टेबल कांबळे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी अंकुश रामकिशन कदम (वय ३२, रा. रामवाडी, ता, चाकूर), हसनकुमार तिलाही उराम (२१, रा. साहबगंज, बिहार), गोकुळ धनराम मेघवाल (रा. चुवा, राजस्थान), धनंजय गहिनीनाथ कोंबडे (रा. लातूर), पारस बालचंद पोखर्णा (रा. लातूर), राम केंद्रे (रा. लातूर) व विजय केंद्रे (रा. लातूर) या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

साहित्य पाहून पोलिस चक्रावले

कोंबडे अॅग्रो वेअर हाऊसमध्ये बिनधास्त गुटखा तयार केला जात होता. तेथील आतील रचना, साहित्य पाहून पोलिस चक्रावले. तेथे अल्पवयीन दोन मुलेही काम करताना आढळली. छाप्यात पोलिसांनी वेगवेगळी भरलेली पोती आढळली.

त्यात ४८ लाख ३८ हजार ४०० रुपयांचे गोवा गुटख्याचे २० हजार १६० पुडे, ७० लाख ८० हजार रुपयांचे खुल्या स्वरूपातील गुटखा, एक लाख ८० हजार रुपयांचे सुगंधित तंबाखू, ५५ लाखांची सुगंधी सुपारी, ४९ लाख रुपयांची सुगंधी गुटखा पावडर, तीन लाख ७५ हजारांचे रॅपर रोल बंडल, एक लाख ४५ हजारांचे पाकीट कव्हर रोल बंडल, ३२ लाख ५० हजारांची पॅकिंग मशीन, साठ हजारांची पॅकिंग रोलर मशीन, पुडी पॅकिंग, वीस हजार रुपयांची पोती शिवण्याची मशीन, तीस हजारांचे वजनकाटे आदींसह वजीर गुटखा पॅकिंग रॅपर रोल, नायलॉन पोती, गोवा गुटख्याच्या पोत्यात भरलेल्या पुड्या व ट्रक (एमएच २३ डब्ल्यू ०९८१) असा एकूण तीन कोटी पाच लाख ७३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मी रोहित शर्माच्या जागी असतो, तर पर्थ कसोटी खेळण्यासाठी पोहोचलो असतो', Sourav Ganguly च्या विधानाची चर्चा

Latest Maharashtra News Updates live : अमित शाह यांच्याऐवजी स्मृती इराणी आणि शिवराजसिंह चौहान यांच्या सभा

कऱ्हाड उत्तर-दक्षिण मतदारसंघांत आघाडी धर्म? पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील एकाच व्यासपीठावर; दोन्ही गटांनी घेतलं जुळवून!

Election Voting : मतदान कार्ड नाहीये? चिंता कशाला, या 12 पैकी कोणत्याही ओळखपत्रांद्वारे करा मतदान

विद्या नाही , माधुरी नाही तर 'ही' आहे खरी मंजुलिका ; बिहाइंड द सीन व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT