file photo 
मराठवाडा

जुगारावर छापा; तीन लाखावर मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

परभणी : जायकवाडी परिसरातील एका आखाड्यावर तिर्रट पत्ते खेळणाऱ्यांवर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या पथक क्रमांक २ ने सोमवारी (ता.१५) सकाळी टाकलेल्या छाप्यात कारवाई करण्यात आली. याप्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पथकाने रोख रक्कम, मोटारसायकल, मोबाइल असा एकूण तीन लाख १२ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


नवामोंढा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जायकवाडी परिसरातील एका आखाड्यावर काही व्यक्ती पैशावर पत्ते जुगार खेळत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या क्रमांक २ च्या पथकास मिळाली. त्यावरुन पथकाने सोमवारी सकाळी सापळा रचून त्या ठिकाणी छापा मारला. या छाप्यात सचिन बालाजीराव शिंदे, महेंद्र किशनराव जोंधळे, विक्की राजेंद्र खंदारे, अजय पंजाबराव मोरे, विठ्ठल अनिलराव डिगोळे, पवन कोंडिबा माने, संतोष कलाने हे जायकवाडी परिसरातील एका शेतात आखाड्यावर गोलाकार बसून तिर्रट नावाचा जुगार हार-जीतवर पैसे लावून खेळत असतांना मिळून आले. या छाप्याच्या वेळी संतोष कलाने हा तेथून फरार झाला. पंचासमक्ष केलेल्या झडतीत या इसमांकडून पत्ते कॅट, रोख रक्कम, पाच दुचाकी, मोबाइल, असा एकूण तीन लाख १२ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सात जणांवर नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक, कृष्णकांत उपाध्याय, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्‍वास खोले, पोलिस नाईक पटेल, पेटकर, शिंदे यांनी केली.


हेही वाचा..

अठरा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
गंगाखेड (जि.परभणी) :
नियमावलीचे उल्लंघन करीत प्रतिष्ठाणे बंद ठेवण्याच्या दिवशीही खुलेआम आपली प्रतिष्ठाणे सुरू ठेवल्यामुळे नगर परिषदेच्या पथकाने शहरातील अठरा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याची घटना सोमवारी (ता. १५) रोजी घडली.
मोहम्मद गौस शेख अजमोदिन कटलरी दुकान नगर परिषद कार्यालयासमोर, शेख खलील शेख हसेन जनरल स्टोजर्स पालिकेसमोर, सय्यद भाई जनरल स्टोअर्म पालिकेसमोर, श्रीनिवास जनरल स्टोअर्स संजयकुमार मारोतराव डाके, हिना जनरल स्टोअर्स शेख फारोक शेख अजमोद्दिन नगर परिषदेसमोर , सुरेश नारायण मिसाळ जनरल स्टोअर्स बहुउदेशीय सभागृहाच्या पश्चिमेस नगर परिषद व्यापार संकुल, जनता इलेक्ट्रिकल्स माणिक बंगाळ लटपटे कॉम्पेल्म, विश्वकृपा इलेक्ट्रिक सानप यांचे एकनाथ मार्केट सुधाकर धोंडिबा भोसले , राजेश भक्तराज फर इलेक्ट्रिलकल्स भंडारी कॉम्पलेक्स, वर्षा भांडी स्टोअर्स भगवती चौक रमेश पंडरीनाथ महाजन, राजेश मारोती यानपल्लेवार नागनाथ भांडी स्टोअर महात्मा बसवेश्वर व्यापार संकुल, नागेश्वर मोबाइल शॉप बशिष्ठ बालासाहेब धारे कॉम्पेल्स जुनी भाजी मंडी, उज्ज्वल वसंतराव पेकम जुना मोंढा-फर्निचर दुकान, समर्थ मोबाइल शॉपी भरड कॉम्पलेक्स कब्रस्तान रोड, कृष्णा भांडी स्टोअर्स कृष्णा यानपल्लेवार जुनी भाजी मंडी, गोविंदराज इलेक्ट्रिकल्स लक्ष्मण बालासाहेब लटपटे एकनाथ मार्केट आदालत रोड, सुचिता इलेक्ट्रिकल्स लटपटे कॉम्पलेक्स विनोद अमीलकंठवार आदालत रोड, स्टार मोबाइल शॉप नदिम मैनुद्दिन खान पालिकेसमोर यांच्यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गंगाखेड पोलिसात पालिका कर्मचारी बोडके यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT