पूर्णा(जि.परभणी) : पूर्णा येथील रेल्वे स्थानकावर डबल इंजिनद्वारे सेंट्रिंग करण्यात येत होते. दरम्यान, सोमवारी (ता.११) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास इंजिन रेल्वे पटरीचा शेवटचा थांबा ओलांडून पुढे गेले आणि मातीत फसले. त्या ठिकाणी असलेल्या विजेचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या डीपीवर ते धडकले.
या वेळी मोठा आवाज झाला. त्यानंतर अनेकांनी तिकडे धाव घेतली. तांत्रिक विभागाचे कर्मचारी व मोठे क्रेन आणण्यात आले असून ते रेल्वे इंजिन उचलून पटरीवर ठेवण्याच्या कामास वेग आला आहे. नेमकी मर्यादा रेषा ओलांडून इंजिन का पुढे गेले हे चौकशीत पुढे येईल.
लोकोशेड परिसरात इंजिन, मालगाडीचा असतो थांबा
दरम्यान, लोकोशेड परिसरात अनेक इंजिन आणि मालगाडी यांचा थांबा असतो. या ठिकाणी विविध इंजिनची सेंट्रिंग केली जाते. काही डब्बे पुन्हा स्थानकात आणण्यासाठी दिवसभरात अनेक वेळा इंजिनची सेंट्रिंग होत असते. प्रत्येक वेळी सेंट्रिंग करताना सिग्नल यंत्रणा कार्यान्वित असते. त्यामुळे चालक आणि लोकोपायलट यांचे सिग्नलकडे लक्ष असते. तरी नेमका हा प्रकार कसा घडला, ते कळु शकले नाही.
मालवाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु
सध्या मागील दीड महिन्यापासून रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असली तरी मालवाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दिवसभरात सिकंदराबाद, नागपूर, मुदखेड मार्गे पूर्णा आणि परळीकडे जाणाऱ्या मालगाडीची संख्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यासाठी सर्व यंत्रणा कायम सज्ज आहे. प्लॅटफॉर्म रिकामे असले तरी अनेक प्रवासी गाड्या लोकोशेडजवळ उभ्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : वाळू उपशावर छापा; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त
अत्यावश्यक यंत्रणा पूर्णेतच कार्यान्वित
दक्षिण मध्य रेल्वे विभागातील नांदेड मंडळात पूर्णा जंक्शन हे महत्वाचे स्थानक आहे. येथे विभागातील कोणत्याही ठिकाणी अत्यावश्यक सुविधेची गरज पडल्यास क्रेन पाठविण्यात येते. तसेच येथे डॉक्टरांचे पथक असलेले वाहन आणि ट्रॅक मेन्टनंसचे वाहन आणि यंत्रणा उपलब्ध आहे. सर्व मनुष्यबळाची उपलब्धता असल्याने कुठेही गरज पडल्यास तिला पाठविले जाते. तसेच रेल्वे इंजिनसाठी डिझेलसुध्दा टाकण्याची सुविधा येथे असल्याने पॅसेंजर, मेन एक्सप्रेस आणि मालगाडीचे इंजिनमध्ये डिझेल फिलिंगची सोय उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.