Jintur Rain News sakal
मराठवाडा

Jintur Rain News : नदी,नाले खळाळले; जिंतूर तालुक्यात ६ दिवसात ११२ मिलिमीटर पाऊस, मंगळवारी अतिवृष्टी

मुक्या प्राण्यांसाठी रानात हिरवा चारा उपलब्ध होईल तसेच येत्या रब्बी हंगामातील पीक लागवडीसाठी देखील उपयोगी

राजाभाऊ नगरकर.

जिंतूर : परतीच्या वाटेवर असलेल्या पावसाने आतापर्यंतच्या पावसाळ्यात प्रथमच दमदार हजेरी लावली असल्याने तालुक्यात गेले सहा दिवसात ११२.७ मिलीमीटर पाऊस पडला असून बुधवारी (ता.२७) सकाळपर्यंतच्या चोवीस तासात ४१.१ मिलीमीटर पाऊस पडण्याची नोंद करण्यात आली. दरम्यान मंगळवारी जिंतूर मंडळात अतिवृष्टी झाली.

२१ सप्टेंबरच्या रात्रीपासून कमी अधिक प्रमाणात जिंतूर तालूक्यात सर्वदूर पाऊस पडत असून २३२४,२५ तारखेला मध्यम स्वरूपात जोरदार पाऊस पडला. मंगळवारी (ता.२६) सकाळी दीड दोन तास मुसळधार पाऊस झाला त्यानंतर रात्री उशिरापर्यंत हलक्या,मध्यम पावसाची संततधार सुरुच होती. यादिवशी जिंतूर मंडळात अतिवृष्टी झाली.

या पावसामुळे तालुक्यातील नद्या, नाले, ओहोळ प्रथमच वाहते झाले. तर, पावसाअभावी वाया गेलेल्या पिकानंतर उरलेल्या खरिपातील पिकांना हा पाऊस लाभदायक ठरण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.

मुक्या प्राण्यांसाठी रानात हिरवा चारा उपलब्ध होईल तसेच येत्या रब्बी हंगामातील पीक लागवडीसाठी देखील उपयोगी ठरणार आहे.तरीपण याअगोदरच्या तीन महिन्यात झालेला सर्व पाऊस अपुरा असून भीजपाणी झाला असल्याने भविष्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आणखी दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

दरम्यान बुधवारी (ता.२७) सकाळपासून उन्हाचा कडाका सुरू असताना दुपारी दोन नंतर जवळपास अर्धातास जोराचा मध्यम पाऊस झाला. त्यानंतरही बराचवेळ पावसाची टिप टिप सुरू होती.

बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात मंडळनिहाय पडलेला पाऊस याप्रमाणे. आकडे मिलीमीटर मध्ये. जिंतूर ८८.८, सावंगी-म्हाळसा ७.०, बामणी १६.८, बोरी ५३.५, आडगाव (बाजार) ४२.५, चारठाणा ५२.०, वाघी-धानोरा २०.० आणि दुधगाव ४८.३ याप्रमाणे सरासरी ४१.१ मिलिमीटर पाऊस पडला. या महिन्यात अद्यापपर्यंत १३९.२ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात १६९ मिलिमीटर पाऊस पडला. जो १२१ टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT