आकाशाकडे लागलेल्या डोळ्यांत पाणी, पीकविमा मंजूर करण्याची मागणी
जळकोट (लातूर): खरिपात भरघोस उत्पन्न मिळेल या आशेवर खर्च करत अहोरात्र कष्ट करणारा शेतकरी गेल्या पंधरा-वीस दिवसापांसून पाऊस नसल्याने सोयाबिनसह सर्व पिके कोमेजत, वाळत असल्याने चिंतेत आहे. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांचे स्वप्न करपत असल्याचे चित्र आहे. बी-बियाण्यांसह रासायनिक खतांच्या वाढत्या किमती सहन करत तणनाशके व कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या. आंतरमशागती करुन आकाशाकडे डोळे लावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून पाऊस नसल्याने पिके कोमेजून, वाळत असल्याचे चित्र दिसत आहे. पाऊस नसल्याने वाळत असलेली पिके पाहून शेतकरी चिंतेत आहे.
पीक फुलोऱ्यात असून माना टाकत करपून जाणारे पीक पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. आकाशाकडे डोळे लागले असून मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे. तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १९ हजार १३० हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनचा पेरा असून हे पिक पाऊस नसल्यामुळे धोक्यात आहे. खरिपात मूग, उडिद, तूर, कपाशी आदि एकूण २९ हजार ३९ हेक्टरवरील ही सर्वच पिके पावसाअभावी सुकून कोमेजून वाळत असल्यामुळे चिंता वाढली आहे.
सरसकट पिक विमा द्या- काँग्रेसची मागणी
तालुक्यातील खरिप हंगामात सर्व पिके पावसाअभावी करपून गेली असून तात्काळ सरसकट पिकविमा लागू करावा अशी मागणी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी (ता.१३) तहसीलदार संदीप कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदणात केली आहे. पाऊस नसल्याने पिके वाळून गेली असून शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. तत्काळ पिक विमा लागू करुन ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते मन्मथ अप्पा किडे, तालुका अध्यक्ष मारोती पांडे, शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, पंचायत समिती सभापती बालाजी ताकबीडे, बाबूराव जाधव, संग्राम कांबळे, श्रीनिवास पाटील, प्रदीप राठोड, शिरिष चव्हाण नूर पठाण, यांच्यासह निलेश पाटील, दाऊद पटेल, अंकुश करडे, राजेंद्र वाघमारे, राजु केंद्रे, राजु सगर, सिद्धार्थ सूर्यवंशी, शाहूर बंडे, सत्यवान पाटील, अनिल मुळे, सुनिल बिरादार, संदीप उगीले दत्ता पवार, रियाज सय्यद, माधव कवठाळे, सोनु मगर, संभाजी कोसंबे, पंडित करडे, दयासागर दाडगे, रमेश धर्माधिकारी, नामदेव बंडे, नागनाथ धुळशेट्टे, मन्मथ बुक्के आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
भाजपाचेही तहसीलदारांना निवेदन
तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने उघडिप दिली आहे. त्यामूळे शेतातील सर्व पिके जाग्यावर करपून गेली आहेत. त्यामुळे तत्काळ पिकविमा व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी भाजपाच्यावतीनेही करण्यात आली आहे. यावेळी जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर तथा सामजिक कार्यकर्ते नामदेव कदम यांच्या उपस्थितीत भाजपाच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले असून निसर्गाच्या अवकृपेमूळे शेतकरी संकटात सापडला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर भाजपचे तालुकाध्यक्ष अरविंद नागरगोजे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सोमेश्वर सोप्पा, किसान मोर्चाचे जिल्हाचिटणीस बालाजी केंद्रे, व्यंकट तेंलग, माजी नगराध्यक्ष किशन बोधले, शहराध्यक्ष दत्ता वंजे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालाजी मालुसरे, अजीत गुट्टे, निलेश गडकर, बालाजी गुडसूरे, सत्यवान पांडे, दिलीप कांबळे, संजय गोन्टे, रघुनाथ आडे, दिलीप सोनकांबळे, एकनाथ तेंलग, संभाजी बेळकोटे, आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.