rainfall in jalna beneficial for agriculture  sakal
मराठवाडा

Jalna Rain Update : जालना शहरासह जिल्ह्यात पावसाची रिमझिम, नागरिकांची उडाली तारांबळ

Jalna latest rain news in marathi |अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी आले आहे. सलग दोन दिवसांपासून पावसाची संततधार असल्याने नियमित कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गासह विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत. पावसामुळे अनेकांना कार्यालयात जाण्यास उशीर झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

सकाळ वृत्तसेवा

जालना : शहरासह जिल्ह्यात गुरूवारी (ता.२५) पावसाच्या हलक्या सरी कोसळतच होत्या. रिमझिम पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.

अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी आले आहे. सलग दोन दिवसांपासून पावसाची संततधार असल्याने नियमित कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गासह विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत. पावसामुळे अनेकांना कार्यालयात जाण्यास उशीर झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

दरम्यान, जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप पिकांना दिला मिळाला असला तरी मध्यम व लघु प्रकल्पात पाणीसाठा झालेला नाही. दरम्यान, गुरूवारी सकाळपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ९.१० मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

यामध्ये जालना तालुक्यात ७.५०, बदनापूर ३.९०, भोकरदन १०.६०, जाफराबाद १०.७०, परतूर ८.३०, मंठा ९.७०, अंबड १०.४० आणि घनसावंगी तालुक्यात १०.०० मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

आतापर्यंत ३३७.३० मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यात ता. एक जुनपासून आजपर्यंत ३४६.४० मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये जालना तालुक्यात ३४५.७०, बदनापूर २८१.७०, भोकरदन ३५०.१०, जाफराबाद ३२६.७०, परतूर ४३४.९०, मंठा ४१५.५०, अंबड ३०३.९० आणि घनसावंगी तालुक्यात ३४२.५० मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद महावेधकडे झाले आहे. त्यामुळे आजपर्यंत अपेक्षित पावसाच्या सरासरी १२९.८४ टक्के पाऊस झाला आहे.

पाण्याचे संकट कायम

मागील पावनेदोन महिन्यात एकदाही जोरदार पाऊस न झाल्याने जलसाठ्यात आठ दिवसात अर्धा टक्काही वाढ झालेली नाही. ही परिस्थिती कायम राहिली तर यंदाही पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सात मध्यम व ५७ लघु प्रकल्प आहेत. गतवर्षी पावसाने दगा दिल्याने हे प्रकल्प भरले नव्हते.

परिणामी जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. त्यामुळे यंदा जोरदार पाऊस होईल, अशी अपेक्षा होती. प्रकल्प अद्याप कोरडेच आहेत. त्यात मागील दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र,या पावसाने प्रकल्पातील पाणी साठ्यात अर्धा टक्काही वाढ झालेली नाही. त्यामुळे आज केवळ १.६४ मिलीमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT