पूर्णा : येथील बळीराजा साखर कारखान्याच्या समोर विविध मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (ता.१४) एक तास रास्तारोको आंदोलन केले. त्याच वेळी साखर कारखान्याच्या समर्थनार्थ हजारो ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी एकत्र येत जाहीर सभा घेतली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विविध ठिकाणी व कारखान्यांच्या समोर रास्ता रोको,धरणे आंदोलन करण्यात येत आहेत.त्यात प्रामुख्याने जिल्ह्यातील ऊस संपल्याशिवाय पर जिल्ह्यातील ऊस आणू नये ,पंधरा दिवसात शेतकऱ्यांचे पैसे अदा करावेत, शेअर्सची अट रद्द करावी आदी मागण्या आहेत.
येथील बळीराजा साखर कारखान्या प्रवेश दारा समोरील राज्यरस्त्यावर स्वाभीमानी शेतकरी संघटनेने एक तास रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान बळीराजा साखर कारखान्याचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांनी कारखान्याच्या समर्थनार्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित राहत कारखान्याच्या आतील मैदानावर भव्य मेळावा घेतला.दरम्यान घटनास्थळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक सुभाचंद्र मारकड यांनी मोठा फौजफाटा तैनात करून दोन्ही जमावासोबत सुसंवाद साधत परिस्थिती हाताळली. शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलीसांनी कारखाना परीसरा लगत असलेल्या पूर्णा-ताडकळस रस्त्यावरच अडवून धरले.यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी नायब तहसीलदार नितीशकुमार बोलेलू यांना निवेदन दिले. या प्रसंगी स्वाभिमानी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष हनुमान राजेगोरे , हिंगोली जिल्हाध्यक्ष श्री. अडकिने ,भगवान शिंदे, दिगंबर पवार, भास्कर खटींग, मुंजाभाऊ लांडे, रामप्रसाद गमे , पंडीत भोसले, रामभाऊ आवरगंड, बाळासाहेब घाटोळ,अनिल बुचाले, नवनाथ दुधाटे, दिलीप शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
बळीराजा कारखान्याच्या समर्थनार्थ झालेल्या सभेस उत्तमराव कदम, बापूराव घाटोळ, विशाल कदम , संजय घाटगे , काशीनाथ काळबांडे मुंजाजी कदम , चांदोजी बोबडे. ॲड.एम. ए. सईद उपस्थित होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, मधुकर पाटील पिंपळगांवकर, आनंद बनसोडे , दसरथ भोसले, मारोतराव बखाल, संभाजी डाखोरे, सुभाष पिसाळ, हनुमंत डाके , तुकाराम वाघ, अनंत बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत कारखाना प्रशासनावर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा विश्वास असल्याचे सांगितले. कारखान्यांमुळे परिसरातील शेतकरी, ऊस वाहतूकदार समृद्ध झाला आहे. बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. मागील आठ वर्षांपासुन विना तक्रार सुरळीत सुरू असलेला हा कारखाना बंद पाडण्याचा घाट सुरू असल्याचे मत यावेळी व्यक्त झाले. यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव जाधव,अधिकारी भगवान मोरे, पुंजाजी बोंडे, श्रीकांत पुदाले, विनायक कदम आदी अधीकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन माधव मोहिते यांनी केले. पुंजाजी बोंडे यांनी आभार मानले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक डिगांबर पवार या शेतकऱ्यांने रास्तारोको सुरु असतानाच भूक लागल्यावर रणरणत्या उन्हात रस्त्यावरच शिदोरी सोडली व ठेसा - भाकरी खाल्ली. आंदोलनातील ते दृष्य लक्षवेधी ठरले .
मराठवाड्यात साखर उतारा , ऊसाचा भाव , गाळप आदी बाबतीत क्रमांक एक ठरणाऱ्या बळिराजा साखर कारखान्याने ही शिस्तबद्धतेमुळे हे यश मिळवले आहे. अनेक बेरोजगारांसाठी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा कारखाना वरदान ठरला आहे त्याला दृष्ट लावण्याचे पाप कोणीही करू नये असे आवाहन केले. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनीही शेतकऱ्यांसोबत नम्र व सौजन्यपूर्ण वागावे अशी अपेक्षा आहे .
- विशाल कदम , शिवसेना जिल्हा प्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.