file photo 
मराठवाडा

नांदेडची गुन्हेगारी एका क्लिकवर वाचा...  

प्रल्हाद कांबळे

नांदेड : बरडशेवाळा (ता. हदगाव) येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ८१ हजाराचे सोन्या- चांदीचे दागिणे लंपास केले. ही घटना बुधवारी (ता. २९) जानेवारीच्या सकाळी घडली. याप्रकरणी मनाठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बरडशेवाळा येथील बालाजी बाबाराव कुंभारकर (वय ५८) हे आपल्या घराचे दार बंद करून गावात मुरमुरे आणण्यासाठी गेले होते. गावात जावून मुरमुरे आण्यासाठी त्यांना वेळ लागला. या दरम्यान त्यांच्या घरात अज्ञात चोरटे घुसले. लाकडी आरमारीचे कुलूप तोडून त्यातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले नगदी रुपये व सोन्या- चंदीचे दागिणे असा ८१ हजाराचा ऐवज लंपास केला. मुरमुरे घेऊन ते घरी आले असता आपल्याकडे चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मनाठा पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंडे करत आहेत. 

नांदेडच्या इतवारात रुग्णालय फोडले

नांदेड- इतवारा भागात असलेले फतिमा रुग्णालय अज्ञात चोरट्यांनी फोडून गल्ल्यातील नगदी २५ हजार रुपये लंपास केले. ही घटना शुक्रवारी (ता. ३१) सकाळी घडली. फक्त चोरट्यांनी पंधरा मिनीटात चोरी करून पोबारा केल्याचे तक्रारीत नमुद आहे. डॉ. शाहिनजबीन युसुफखान यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार रसुल शेख करत आहेत. 

देगलुरमध्ये गॅस एजन्सी फोडली

नांदेड- देगलुर येथील बिरादार गॅस एजन्सी अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी (ता. ३१) रात्री फोडली. एजन्सीच्या गल्ल्यातील ३१ हजार ७०० रुपये लंपास केले. शनिवारी आपली एजन्सी उघडण्यासाठी जनार्धन बिराजदार आले असता शटर फोडलेले त्यांच्या लक्षात आले. शटर उघडून आत जावून पहातात तर गल्ला फोडून वरील रक्कम पळविल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच देगलूर पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास फौजदार श्री. ठाकूर करत आहेत. 

सिडको परिसरात मटका तेजीत

नांदेड- सिडको परिसरातील ढवळे कॉर्नर जवळ आॅनलाईन मटका सुरू असल्याची माहिती नांदेड ग्रामिण पोलिसांना मिळाली. यावरून शनिवारी (ता. एक) सायंकाळी सहाच्या सुमारास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश थोरात यांनी छापा टाकला. यावेळी या मटका अड्ड्यावरून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून नगदी व जुगाराचे साहित्य असा १३ हजार ८०० रुपयाचा ऐवज जप्त केला. सुरेश थोरात यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणय्त आला आहे. तपास पोलिस नाईक श्री. कऱ्हाळे करत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दीपक केसरकर म्हणजे 'ऑल राउंडर सचिन तेंडुलकर', माझ्यासाठी ते 'फायटर' आहेत; असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Nagpur Crime : एमडी द्यायला आला अन्‌ पोलिसांच्या तावडीत अडकला, ५४ ग्रॅम एमडीसह पिस्तूल जप्त

Ranji Trophy 2024-25: मुंबईसाठी करो वा मरो परिस्थिती, महाराष्ट्राचे पॅकअप; पहिल्या टप्प्यानंतर असे आहेत पाँइंट्स टेबल

Healthy Tea : सिताफळ बासुंदी खाल्ली असेल, सिताफळाचा चहा प्यायलात का? होतील अनेक फायदे

Sushma Andhare : आता काय नारायण राणेंना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायचे का? सुषमा अंधारेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT