file photo 
मराठवाडा

हिंगोलीत लॉकडाऊन काळात 3983 गरोदर मातांची नोंदणी

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : लॉकडाउनमुळे सर्वच घटकाला त्याची झळ बसली असताना एक सुखद धक्का मातृत्वाची ओढ असणाऱ्या महिलांना बसला आहे. लॉकडाउन होण्याआधीच्या काळापेक्षी लॉकडाउनमध्ये गरोदर मातांची नोंदणी वाढली आहे. तीन हजार 983 गरोदर मातांची नोंदणी एप्रिल ते मे महिन्यात झाली असून दोन हजार 403 प्रसूती देखील याच कालावधीत झाल्या असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मार्च महिन्यात लॉकडाउन सुरू झाल्याने तब्बल तीन महिने सर्व व्यवहार बंद होते. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कार्यालय, अस्थापना बंद राहिल्याने कुटुंबासोबत वेळ मिळाला. लॉकडाउनचे अनेक नफे- तोटे समोर येत आहेत. अनेक दिवसांपासून कुटुंबापासून, गावापासून दूर झालेली माणस एकत्र आली. नात्यातील जिव्हाळा वाढला, खर्च कमी झाला. आरोग्य सुधारले. कुणाच्या घरात कौटुंबिक नाते घट्ट झाले, तर कुणामध्ये प्रेमाचा उमाळा दाटून आला.


दोन हजार 403 महिलांची प्रसूती

तीन हजार 983 मातांची प्रसूती लॉकडाउन काळातदेखील आरोग्य विभागाचे लसीकरण, गरोदर मातांच्या नोंदी घेण्याचे काम सुरू होते. या दरम्यान, घेतलेल्या नोंदीत लॉकडाउन काळात एप्रिल ते मे महिन्यात महिलांत गरोदर राहण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. दोन महिन्यांत तीन हजार 983 महिलांनी गरोदर असल्याची नोंद केली आहे. गरोदर मातांसोबतच लॉकडाउनमध्ये प्रसूती झालेल्या महिलांची संख्यादेखील मोठी आहे. दोन महिन्यांत दोन हजार 403 महिलांची प्रसूती झाली आहे. या बाबत आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. 

लसीकरणात खंड नाही 

लसीकरणात खंड नाही गरोदर माता आणि लहान बालकांच्या लसीकरणात लॉकडाउनमध्ये कोणताही खंड पडू न देता आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे. आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिकांनी सेवा बजावली आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात 1928 तर मे महिन्यात 2055 अशी एकुण 3983 दोन महिन्यांत नोंदणी झाली आहे. तर याच कालावधीत एप्रिल महिन्यात शासकीय रुग्णालयात 818 तर खाजगी रूग्णालयात 328 अशा एकूण 1146 महिलांची प्रसुती झाली आहे. 

जिल्हा आरोग्य विभागाची माहिती

तर मे महिन्यात शासकीय रुग्णालयात 818 तर खाजगी  रूग्णालयात 426 अशा एकुण 1357 महिलांची प्रसूती झाली आहे. जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यांत 3983 गरोदर मातांची नोंदणी झाली आहे तर याच कालावधीत 2403 महिलांची प्रसुती झाली आहे. डॉ. शिवाजी पवार ( जिल्हा आरोग्य अधिकारी)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : मनसे पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT