फोटो 
मराठवाडा

अत्याचारी शिक्षकांना शासन करा-‘दामिनी’ ग्रुप

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शंकरनगर (ता. नायगाव) येथील दोन शिक्षकांनी सहावीत शिक्षण घेणाऱ्या आपल्याच विद्यार्थीनीवर पाशवी बलात्कार केला. ही घटना माणुसकीला व शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी आहे. यात गुंतलेल्या नराधम शिक्षकांना अटक करून त्यांना कडक शासन करा अशी मागणी ‘दामिनी’ ग्रुपच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के यांच्या मार्फत जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.  

शंकरनगर येथील श्री साईबाबा विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका सहावीतील मुलीला सांस्कृतीक कार्यक्रमाचे फोटो दाखवतो म्हणून शाळेतील एका खोलीत नेऊन तिच्यावर दोन नराधम शिक्षकांनी पाशवी बलात्कार केला. घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून या घटनेतील नराधम शिक्षक सय्यद रसुल आणि दयानंद राजूळे यांच्यासह मुख्याध्यापक प्रदीप पाटील, प्राचार्य धनंजय शेळके आणि एका महिलेला तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

शिक्षणासारखे पवित्र ठिकाण कलंकीत

शिक्षणासारख्या पवित्र ठिकाणी जर मुली सुरक्षीत नसतील तर मग न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एवढेच नाही तर हा किळसवाणा प्रकार घडल्यानंतर संस्थाचालक व त्यांचे चमचे हे प्रकरण दडपून मुलीला रुग्णालयात घेऊन जा असा सल्ला देतात. अशा संस्थाचालकांना लाज वाटली पाहिजे. असा आरोप करत या महिलांनी या घटनेची तिव्र शब्दात निषेध केला. यावेळी दामिनी ग्रुपच्या सुरेखा किनगावकर, धनश्री देव, ॲड. दीपा बियाणी, कृष्णा मंगनाळे, पूर्वा फडके, डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार, संजीवनी कुलकर्णी, मंगल झंवर, डॉ. ज्योती डोईफोडे, ज्योती जैन, सुचीता भगत, स्वाती गव्हाणे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.  

नराधमांना फाशी द्या- बीआरएसपीची मागणी

नांदेड : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने शंकरनगर (ता. नायगाव) येथील साईबाबा विद्यालयातील सहावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीवर नराधम शिक्षकांनीच सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी बीआरएसपीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरूण सोनटक्के, नाथाजी कांबळे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष पंडित सोनकांबळे, आशीष कदम, सूर्यकांत शिंदे, प्रकाश गायकवाड, डी. एस. देवकांबळे, प्रकाश तुळशे, रवी हडसे आदींची उपस्थिती होती.

टायगर ग्रुपचे निवेदन, बुधवारी नांदेड बंदचे आवाहन

नांदेड : शंकरनगर (ता. नायगाव) येथील अत्याचार पीडीत मुलीच्या आरोपींना अटककरून त्यांच्याविरूध्द अतीजलद न्यायालयात खटला चालवून पीडीतेला न्याय द्यावा व सर्व आरोपींना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी टायगर ग्रुपच्या वतीने करण्यात आली. 

एवढेच नाही तर संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. २२) जानेवारी रोजी नांदेड बंदचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नांदेडमधील एकही शाळा, महाविद्यालय आरोपींना अटक करेपर्यंत चालु देणार नाही असा इशारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

Latest Maharashtra News Updates live : दिवाळीनंतर कार्यकर्त्यांची दिवाळी

SCROLL FOR NEXT