latur sakal
मराठवाडा

Republic Day 2024 : पोलिस अधीक्षक सोमय मुंडेंना शौर्यपदक ; गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध पथकांसह केलेल्या कारवाईची दखल

गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या शस्त्राचा कारखाना उद्‍ध्वस्त करण्याच्या मोहिमेसाठी येथील पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांना केंद्र शासनाने पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली येथे २०२१ मध्ये सोमय मुंडे हे अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत होते.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या शस्त्राचा कारखाना उद्‍ध्वस्त करण्याच्या मोहिमेसाठी येथील पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांना केंद्र शासनाने पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली येथे २०२१ मध्ये सोमय मुंडे हे अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर जंगलात सशस्त्र नक्षलवादी जमा झाले असून गस्त घालणाऱ्या पोलिसांवर ते हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.

त्यानुसार दोन मार्च २०२१ ला कोबिंग ऑपरेशन राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली १०४ पोलिस अंमलदार व अधिकाऱ्यांची एकूण आठ विशेष पथके तयार करून प्राणहिता येथून २१ किलोमीटरपर्यंत पायपीट करून नक्षलवाद्यांचा शोध घेण्यात आला होता. यावेळी काही सशस्त्र नक्षलवादी दिसले होते.

त्यावेळी सोमय मुंडे यांनी पथकांची विभागणी करून पाच ते सहा किलोमीटर जंगलातून नक्षलवाद्यांचा पाठलाग केला. नक्षलवाद्यांचा गड असलेल्या महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर नारायणपूर जिल्ह्यातील अबुजमध भागात पोचल्यावर नक्षलवाद्यांनी अचानकपणे पोलिसावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. मुंडे यांच्या पथकाने प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांवर जोरदार गोळीबार केला. पोलिसांचा दबाव वाढल्याने नक्षलवादी तेथून पळून गेले. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पथकामधील एक कमांडो गंभीर जखमी झाला होता.

पथकाने केलेल्या तपासणीत नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मितीचे युनिटचे ठिकाण आढळले. तेथे कच्चामाल आणि शस्त्र निर्मितीसाठी वापरले जाणारे मशिन्स, अर्धवट बनवलेले रायफल्स, ग्रॅनेट लॉन्चर, राउंड, गन पावडर, सल्फर तसेच गावठी बॉम्बसाठीच्या वस्तू जप्त केल्या होत्या. या कारवाईत विजय आणि संगीता नावाचे दोन नक्षलवादी ठार झाले व एक नक्षलवादी गंभीर जखमी झाला होता. तीन चकमकी होऊनही जीवित हानी होऊ न देता पथकाने हा कारखाना उद्‍ध्वस्त केला होता. या उत्कृष्ट कार्याबद्दल केंद्र सरकारने मुंडे यांना पोलिस शौर्य पदक जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : तुम्ही मला निवडलं, अजित पवारांना निवडलं आता युगेंद्र पवारला निवडून द्या - शरद पवार

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT