नांदेड : देशात फैलावत असलेला कोरोना विषाणूजन्य आजार व उपाययोजनांसाठी लागणारी आर्थिक मदत यासाठी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत जिल्ह्यातील नागरिकांनी रोख एक लाख रक्कमेसह २६ लाख रूपयांचे धनादेश दिले आहेत. या सोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीही धनादेशाद्वारे ३७ हजार रूपयांचा निधीही दिला आहे.
खासदारांचे नागरिकांना आवाहन
देशासह राज्यात कोरोना विषाणूजन्य रोगाने थैमान घातले आहे. या आजाराबाबत उपाययोजना करण्यासाठी निधीची आवश्यकता लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रोगांच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एक कोटी रूपयांचा खासदार निधी दिला आहे. तसेच जिल्ह्यातील जनतेला पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते.
दात्यांचे भरभरुन दान
खासदार चिखलीकर यांच्या आवाहनावरून डॉ. विजय वडजे ११ हजार, डॉ. लक्ष्मण इंगोले ११ हजार, डॉ. मीनल खतगावकर एक लाख, बिलोली तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन दत्ता पाटील ११ हजार, आबाराव सायन्ना दोन हजार शंभर, बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट कौठा भा. ग. देशपांडे एक लाख, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा दोन लाख, भारतीय जनता पार्टी भोकर व्यापारी मित्रमंडळ एक लाख पाच हजार, दिलीप सोनटक्के ११ हजार, डॉ. विनोद जाधव पाच हजार, समस्त गावकरी मंडळी गणपूर पाच हजार ५५५, अर्धापूर शहर नागरिकांच्यावतीने ११ हजार, राम कदम पाच हजार, नागोराव बिचकुले पाच हजार, समस्त गावकरी मंडळी कामठा दहा हजार, बालाजी स्वामी अर्धापूर पाच हजार.
हेही वाचलेच पाहिजे..... नांदेडात पोलिसांच्या पथसंचलनावर पुष्पवृष्टी
व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचेही योगदान
सतीश पाटील धर्माबाद ११ हजार, रविंद्र पोतगंटीवार धर्माबाद ११ हजार, गणेशराव पाटील करखेलीकर धर्माबाद ११ हजार, भास्कर चाकरोड ११ हजार, रमेश गोंड, स्वामी गोंड धर्माबाद 5 हजार, व्यंकट भोसके धर्माबाद अकराशे, श्री विजय डांगे धर्माबाद ११ हजार १११, नांदेड मर्चन्ट बँक (दिलीप कंदकुर्ते ११ लाख), भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लिलाबाई अंबटवाड चार लाख ५१ हजार, खासदार प्रताप पाटील चिखलीकर नांदेड एक लाख, माजी आमदार अविनाश घाटे दहा हजार, फुले समाज सुधारक समिती मुखेड ७० हजार, ज्ञानेश्र्वर विद्यालय तळणी (संतोष क्षीरसागर) १० हजार,
लोहा तालुक्यात प्रतिसाद
शरद नामदेव पवार, भाजप तालुकाध्यक्ष लोहा २१ हजार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लोहा सात हजार पाचशे, दीपक कानवटे लोहा पाच हजार, गोपाळ पवार लोहा पाच हजार, श्री. गंगा पेट्रोलियम लोहा पाच हजार, धनाजी पाटील दिघे कारेगाव तीन हजार शंभर, राम पाटील किरवले कारेगाव पाच हजार, नाना तिडके माळाकोळी अकराशे, बालाजी अंकुलवार लोहा एक हजार, डॉ. दिनेश राठोड लोहा एक हजार ५१, संजय मोटे एक हजार एक, बेजगमवार मेडिकल लोहा अकराशे, बाळू पाटील गवते पेनूर तीन हजार, गंगाधर पवार लोहा अकराशे, मोहन मुंडे लोहा पाचशे, मनोज शेलगावकर लोहा अकराशे, गोविंद फाजगे लोहा एक हजार, दिनेश बगाडे लोहा एक हजार, गजानन सूर्यवंशी नगराध्यक्ष लोहा २१ हजार, वर्षकेतु कऱ्हाळे अकराशे. उद्धव कदम देगाव (ता. अर्धापूर) सात हजार ७०७ असा एकूण २५ लाख ३४ हजार ३१२ रूपये मदतीचे धनादेश पंतप्रधान साहाय्यता निधीसाठी देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीलाही दिला निधी
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी शिवाजी होळगे अकराशे रूपये, सुधाकर पवार अकराशे रूपये, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ३४ हजार ४३४ रूपयांचा धनादेश दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.