औरंगाबाद - कामातील सचोटी आणि शुद्ध आचरणाला बगल देत पैशांची चटक लागलेल्या अधिकाऱ्यांमध्ये महसूल व पोलिस खात्यातील अधिकारी, कर्मचारी यंदादेखील राज्यात आघाडीवर असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
जानेवारी २०१८ ते २१ नोव्हेंबर २०१८ या काळातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्यस्तरीय आकडेवारीनुसार, ७७७ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. यामध्ये महसूल विभाग १९३, तर पोलिस विभागात १६६ असे एकूण ३५९ कारवाया या दोन विभागांतच झाल्या.
एकूण लाचेच्या प्रकरणांमध्ये १०३१ जणांना पकडण्यात आले. त्यात महसुलातील २४४ आणि २१८ पोलिस कर्मचारी आढळले. म्हणजेच निम्म्याच्या आसपास लाच सापळे; तसेच पकडलेल्यांमध्ये या दोन विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समोवश आहे. त्यावरून या खात्यातील अधिकारी-कर्मचारी नागरिकांची अडवणूक, भ्रष्टाचारात आघाडीवर असल्याचे स्पष्ट होते.
विभागनिहाय आकडेवारीनुसार पुणे लाच प्रकरणांमध्ये आघाडीवर असून, मुंबई विभागात सर्वांत कमी प्रकरणे आढळली.
विभागनिहाय प्रकरणे - पुणे १७२, नागपूर ११५, औरंगाबाद १०३, नाशिक ९४, अमरावती ९१, ठाणे८९, नांदेड ७७, मुंबई ३६.
पाटबंधारे विभागात अपसंपदेचा गाळ
आठ विभागांपैकी पाटबंधारे विभागात अपसंपदेचा मोठा गाळ जास्त साचला आहे. एकूण २३ प्रकरणातील १५ प्रकरणे केवळ पाटबंधारे खात्याचेच आहेत. एकूण १०८ पैकी तब्बल ७१ जण पाटबंधारे विभागाचे असून, त्यातील ६२ वर्ग एकच्या अधिकाऱ्यांचा, तर इतर नऊजण अपसंपदा प्रकरणी लाचलुचपतच्या कचाट्यात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.