Marathwada sakal
मराठवाडा

Marathwada: तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप, वाचा नक्की काय झाले?

Latest Latur News: रेशनकार्डाबाबत नावे समावेश करणे व कमी करण्याबाबत शेकडो प्रकरणे आॕनलाईन केले आहेत

राम काळगे

Nilanga: महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेकडून बेमुदत कामबंद आंदोलन सोमवारी ता. १५. पासून सुरू केले आहे. निलंगा येथील महसूलचे कर्मचारी संपावर असले तरी दुसरीकडे रेशनकार्ड व विविध प्रमाणपत्रासाठी आलेल्या संतप्त नागरिकांनीही तहसिल कार्यालयात ठिय्या केला यामुळे प्रशासन व नागरिकांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे.

या काम बंद आंदोलनामुळे ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना परत जाण्याची वेळ आली आहे.

याबाबतची माहीती अशी की, महसूल विभागाच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रमुख मागण्यासह आजपासूनच राज्यभर कामबंद आंदोलन पुकारले आहे. सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी रेशनकार्डाबाबत नावे समावेश करणे व कमी करण्याबाबत शेकडो प्रकरणे आॕनलाईन केले आहेत.

दोन दिवसाच्या सुट्टीनंतर आज रेशनकार्ड मिळेल म्हणून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात आले होते त्यातच सकाळपासून तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांही बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले होते. त्यामुळे आलेल्या नागरिकांनी थेट तहसिलदार व नायबतहसीलदार यांचे कार्यालय गाठून कामाबाबत विचारणा केली मात्र सध्या कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे आम्ही काय करावे असे हताश उत्तर मिळाल्याने नागरिकांनीही थेट तहसिलदारांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले.

आमचे काम करा तेंव्हाच आम्ही बाहेर जाऊ असा पवित्रा घेतल्याने प्रशासना समोर मोठा पेच निर्माण झाला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या कांही दिवसापासून निलंगा तहसिल कार्यालयात नागरिकांची रेशनकार्डासाठी मोठी गर्दी होती. मात्र यातच ऐन अडचणीच्या प्रसंगी महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मोठी गोची निर्माण झाली आहे.

........

महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या

महसुल विभागचा सुधारीत आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागू करण्यात यावा, अव्वल कारकुन/मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावेते, महसुल विभागाचा आकृतीबंध तात्काळ मंजूर करुन पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणारे महसुल कर्मचारी यांना महसुल विभागात सामावून घेण्यात यावेते, वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत तात्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा, महसुल सहाय्यकाचा ग्रेडपे १९०० वरुन २४०० करण्यात यावा, महसुल सहायक व तलाठी यांना सेवाअंतर्गत एकसमान परिक्षा पध्दती लागू करण्यात याव्यात,

महाराष्ट्र शासन, वित्त विभाग यांची अधिसुचना दिनांक ०३.०२.२०२३ नूसार तात्काळ अव्वल कारकुन यांची वेतन निश्चिती करण्यात यावी, महसुल सहाय्यकाची सेवा जेष्ठता यादी केवळ महाराष्ट्र महसुल अर्हता परीक्षा नियम १९९९ मधील तरतूदीनूसार तयार करण्यात यावी यासह आदी मागण्याचे निवेदन यापूर्वीच देण्यात आले आहे.

या संपामध्ये निलंगा तालुका महसूल संघटना अध्यक्ष श्री गंगाराम सूर्यवंशी, सचिव, श्याम भोसले, अवल कारकुन रामभाऊ मुगळे, प्रसाद जाधव, ओम मानकोसकर, नागेश शिंदे, बालाजी शिंदे, नारायण भोजने, महसूल सहाय्यक अनिल मसलकर, संतोष कांबळे, परमेश्वर सोनटक्के, नेताजी भोजने, दगडू मस्के, तानाजी काळे, माधव बिराजदार, वाहन चालक, माधव जाधव शिपाई सबदर शेख सदर आदी सहभागी होते, तर कोतवाल संघटनेने पाठिंबा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

IND vs AUS, BGT: चेतेश्वर पुजारा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिसणार; पण फलंदाज म्हणून नाही, तर...

Kalyan: प्रचार अर्धवट सोडून उमेदवार सुलभा गायकवाड धावल्या मदतीला..!

आता तो पूर्वीसारखा नाही राहिला! अंगावर जखमा, हातात सुरा; ‘बागी ४’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

SCROLL FOR NEXT