नांदेड : जिल्हाभरात महिलांना न्याय देण्यासाठी महिला सहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षांतर्गत महिलांसाठी महिला सुरक्षा समिती विशेष समुपदेशन केंद्र, विशेष बाल सहाय्य पथक, स्त्री भ्रुणहत्या प्रतिबंधक उपाययोजना आणि कौटुंबीक हिंसाचार आदींविषयी समुपदेशन व सहाय्य पोलिस अधिक्षक कार्यालयाद्वारे केले जाते. यात सर्वाधीक कौटुंबीक हिंसाचाराच्या प्रकरणांची संख्या सर्वाधिक आहे. २०१९ मध्ये तब्बल ९३८ प्रकरणे दाखल झाली. त्यातील १५८ विस्कळीत झालेल्या जोडप्यांचे समुपदेशन करून पुन्हा सुखी संसार सुरु करण्यात आला.
महिलांसाठी महिला सुरक्षा समिती विशेष समुपदेशन केंद्र, विशेष बाल सहाय्य पथक, स्त्री भू्रण हत्या प्रतिबंधक उपाय योजना, कौटूंबिक हिंसाचार या बाबतीत सहाय्य अशा विविध प्रकारे समुपदेशन व सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. महिला सहाय्य कक्षात पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१९ मध्ये एकुण ९३८ अर्ज दाखल झाले होते. यापैकी १५८ जोडप्यांचे समुपदेशनातून संसार जुळविण्यात आले. तसेच ६६ महिला पिडीतांना त्यांच्या अधिकाराची माहिती देवून त्यांना न्यायालयात दाद मागण्यासाठी कौटूंबिक हिंसाचारापासुन महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ अंतर्गत मदत करण्यात आली.
९७ अर्जांची चौकशी बाकी
कौटूंबिक हिंसाचारामुळे पिडीत १११ पिडीत महिलांना पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्याकरिता शिफारस पत्र देण्यात आले. तसेच ४६ जोडप्यांना महिला तक्रार निवारण समिती सदस्य यांनी स्वतंत्र निर्णय घ्यावा अशी समज दिली. तसेच ४६० अर्ज महिला तक्रार निवारण समिती सदस्यांच्या निर्णयाने निकाली काढण्यात आले आहे. सध्या ९७ अर्ज चौकशीवर आहेत.
शाळा-महाविद्यालयांतून जनजागृती
महिला सहाय्य कक्ष येथे ज्येष्ठ नागरिक समिती अंतर्गत एकुण ३८ अर्ज चौकशी कामी प्राप्त असून त्यापैकी नऊ अर्जात तडजोड, एक ज्येष्ठ नागरिक पिडीतांना न्यायालयात दाद मागण्यासाठी कौटूंबिक हिंसाचारापासुन महिलाचे संरक्षण अधिनियम २००५ अंतर्गत मदत करण्यात आली. व ज्येष्ठ नागरिक समिती सदस्यांनी २३ अर्जामध्ये निर्णय देवून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले आहे. सध्या पाच अर्ज चौकशीवर आहेत. तसेच सन २०१९ मध्ये १२ आश्रम शाळेला भेटी व शहरातील शाळा १२ व काही कॉलेजला भेटी देवून विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले.
हेही वाचलेच पाहिजे - गरज आहे महिलांना स्वातंत्र्य देण्याची
महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी कक्ष सज्ज
जिल्ह्यात महिलांवरील कौटुंबीक हिंसाचारात दिवसोंदिवस वाढ होत आहे. सासरी आलेल्या मुलींनी आपल्या घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा मान- सन्मान केला, सून म्हणून बाहेरून आलेल्या मुलीला जर सासरच्या मंडळीनी आपल्या मुलीसारखी वागणुक दिली तर हा वाद निर्माण होत नाही. लहान-सहान गोष्टीवरून उफाळलेला वाद अनेकांच्या जिवनात वैफल्य निर्माण करु शकते. जिल्हाभरातून आलेल्या अशा वादाबद्दल संंबंधितांचे समुदपदेशन आम्ही करीत आहोत.
- सविता खर्जुले फौजदार, महिला सहाय्य कक्ष, नांदेड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.