Samruddhi Expressway sakal
मराठवाडा

Samruddhi Expressway : ‘समृद्धी’वर वेगमर्यादा आणि नो पार्किंगमुळे अनेकांच्या खिशाला झळ; आठ कोटी लावला दंड

समृद्धी महामार्गावरून प्रवास करणारे काही वाहने ठरवून दिलेली वेगमर्यादा सोडून जादा वेगाने धावतात तसेच काही वाहने नो पार्किंगमध्ये उभी केल्यामुळे अनेक घटना घडल्या.

सकाळ वृत्तसेवा

करमाड - समृद्धी महामार्गावरून प्रवास करणारे काही वाहने ठरवून दिलेली वेगमर्यादा सोडून जादा वेगाने धावतात तसेच काही वाहने नो पार्किंगमध्ये उभी केल्यामुळे अनेक घटना घडल्या. त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत वाहनधारकांना ८ कोटीचा 'ऑनलाइन' दंड लावण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर २०२३ (लेन्थ कटिंग म्हणजे महामार्गा मधली लाईन दोन्ही टायरच्या मध्ये घेऊन चालणे) नो पार्किंग व सुसाट वाहन चालविणाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगर महामार्ग केंद्राच्या पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे डिसेंबर २०२२ मध्ये उ‌द्घाटन झाले होते. त्यानंतर काही महिन्यानी शिर्डी ते घोटी या महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उ‌द्घाटन झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्या हद्दीतून महामार्ग ३९० ते ५१० क्रमांक म्हणजे १२० किलोमीटर हा रस्ता जातो. मुंबईच्या दिशेने जाताना नाशिक जिल्ह्याची हद्द आहे. तर नागपूरच्या दिशेने जाताना जालना जिल्ह्याची हद्द लागते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जाताना सावंगी, लासूर, माळीवाडा, जांबरगाव येथे टोल नाके आहे.

या दोन्ही बाजूला जाणाऱ्या वाहनांची गेल्या वर्षभरात मोठी गर्दी दिसून आली. २०२३ वर्षात २९५ वाहनांना नो पार्किंग ३ लाख १० हजार ७५० रुपये दंड झाला असून, मयदिपेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या ४ हजार ३७७ वाहनांना ७ कोटी ३६ लाख ६०३८ रुपये दंड लावण्यात आला असून आतापर्यंत ३५५ वाहनांकडून ३७ लाख ७५०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

ट्रक, बस, टेम्पो व इतर अवजड वाहने प्रती तास ८० किमी वेगाने धावता येते तर कार, जीपला प्रतितास १२० किमी वेगाने धावता येते. परंतु यापेक्षा जास्त वेगमर्यादेसाठी कार व जीपला दोन हजार रुपये व ट्रकसह अन्य वाहनांसाठी चार हजार रुपये दंड आकारला जातो तसेच, सर्व प्रकारची वाहनांना नो पार्किंग, लेन्थ कटिंग चुकीमुळे ५०० रुपये दंड आकारला जातो. परंतु डबल चूक झाल्यास १५०० दंड आकारला जातो.

दंडाची रक्कम मुदतीत भरावी

दंडाची रक्कम मुदतीत भरावी असे आवाहन करण्यात आले असून महामार्गा पोलिसांकडे दंडाची रक्कम भरण्याची सुविधा आहे. अन्यथा पुढे वाहनधारकांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. वाहन चालविताना नियम पाळून वेग मर्यादेत वाहने चालवावी. यामुळे पोलिसांना दंड आकारण्याची वेळ येणार नाही. गणेश गिरी, पोलिस निरीक्षक, महामार्ग पोलिस केंद्र, छत्रपती संभाजीनगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT