Sandipan Bhumre  sakal
मराठवाडा

Sandipan Bhumre :मराठवाड्याच्या विकासासाठी प्राधान्याने लक्ष देणार; नागरी सत्काराप्रसंगी खासदार संदीपान भुमरेंचे प्रतिपादन

Marathawada Development: जिल्ह्याच्या विकासासाठी कोणताही निधी कमी न पडू देता जिल्हयाचा विकास करून चेहरामोहरा बदलू

हबीबखान पठाण

Pachad: जनतेनी मोठ्या विश्वासार्हतेने खासदार म्हणून निवडून दिले, आपणांवर टाकलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. आता केवळ छत्रपती संभाजीनगर नव्हे तर मराठवाड्याची जबाबदारी स्विकारताना आपण मराठवाड्यातील सर्व प्रलंबीत प्रश्न मार्गी लावून विकासासाठी प्राधान्याने काम करू, जिल्ह्याच्या विकासासाठी कोणताही निधी कमी न पडू देता जिल्हयाचा विकास करून चेहरामोहरा बदलू, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी केले.

शनिवारी (ता.सहा) जन्मगावी पाचोड (ता.पैठण) येथे छत्रपती संभाजीनगरच्या खासदारपदी विजयी झाल्याबद्दल आयोजित नागरी सत्काराप्रसंगी पालकमंत्री 'तथा' नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांची पाचोड -पैठण चौकातून मधुमालती मंगल कार्यालयापर्यत ढोलताशां, डिजेच्या निनादात व गुलाल व पुष्पाची उधळण करीत फेरी काढण्यात येऊन मंगल कार्यालयात पाचोडसह परिसरातील नागरिकांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सहा जेसीबी व क्रेनमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी खासदार भुमरे म्हणाले,'ऐन वेळी पक्षाच्या वतीने केवळ अठरा दिवस शिल्लक असतांना उमेदवारी मिळाली. मात्र पैठण तालुक्याचे छत्रपती संभाजीनगरात मतदान नसतांना सर्वांनी अवघा जिल्हा पिंजून काढला, अथक परिश्रम घेतले.पालकमंत्री व रोहयो मंत्रीपदाच्या माध्यमातुन राबविलेल्या थेट नागरिकापर्यंतच्या योजनांमुळे सर्वांचा लाभ झाला व एक लाख पस्तीस हजार मताधिक्यानी मतदारांनी निवडून दिले.

मतदारांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वास व प्रेमाला मी तडा जाऊ देणार नाही. केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्हाच नव्हे मराठवाडयातील प्रलंबीत प्रश्न लोकसभेत मांडून विकासासाठी हवे तेवढे प्रयत्न करेन.

माजी खासदार चंद्रकांत खैरे माझेवर टिका करीत होते, त्याचा वचपा काढण्याची हीच वेळ होती व ती मतदारांनी दाखवून दिली. आता खैरेचे नाव घेणे सुद्धा योग्य नाही. त्यांने मी निवडून येवू नये म्हणून त्याच्या घराच्या भितीवर "भुमरेचा पराभव होवो व खैरे विजयी होवो" असे लिहीले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस,अजीतदादा यांच्या आशीर्वादाने आपण विजयी झालो. आता आपणावर आलेली जबाबदारी मी योग्य रितीने पार पाडून जिल्हयाचा विकास करेन. रस्ते, पाणी, विज आदी प्रश्न प्राधान्याने मार्गी लावेन.

राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबीनेट मंत्रीपद मिळताच पहील्याच बैठकीत ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेला ८९० कोटी रुपये मंजुर केले. त्यानंतर मराठवाडा वॉटर ग्रीड योजना, रस्ते, फळबागा अशा असंख्य योजना मंजुर करून सर्वत्र शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले. रोहयो अंतर्गत विहीरीस अडीच लाखाहून चार लाख व आता नव्वद हजारांची वाढ करून प्रति विहिरीस चार लाख नव्वद हजार अनुदानाची तरतुद केली.

आपल्या भाषणात शेवटी खासदार भुमरे यांनी पैठण विधानसभेसाठी नाव न घेता सांकेतिक भाषेत आपला मुलगा विलास भुमरे यांच्या उमेदवारीचा कानमंत्र दिला. ते म्हणाले, आतापर्यंत भुमरे कुटुंब जनतेच्या सुखदुःखात सहभागी आहेत. आता येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत तुम्हीच सर्वजण निवडणूकीत उभे आहात असे समजून सर्वांनी काम करावे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य विलास भुमरे, पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू भुमरे, जिजा भुमरे , कृष्णा भुमरे, आबासाहेब भुमरे, सरपंच शिवराज भुमरे, राम भुमरे, ज्योतिताई पठाडे,पुष्पाताई गव्हाणे, उपसरपंच शिवाजी भालसिंगे, माजी सरपंच जयकुमार बाकलीवाल, लेखराज जैस्वाल, कमलाकर एडके,राहुल नरवडे,पाचोड खुर्दचे उपसरपंच नितीन वाघ, दिनकर मापारी, भागवत नरवडे, हारुण पठाण , बाबासाहेब डिघूळे प्रा. डॉ. चंद्रसेन कोठावळे, नंदु पठाडे. भाऊसाहेब गोजरे ,राजू नारळे,नंदु काळे,

विजय गोरे,शाम तागडे,ज्ञानदेव बढे,दत्ता भुमरे यांचेसह शेकडो जण उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT