नांदेड : गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे पुरस्कार पाच वर्षांपासून रखडले आहेत. अस्तित्वात असणाऱ्या तंट्याबरोबर नव्याने निर्माण झालेले तंटे मिटविण्यात येत आहेत. गावच्या वेशीतच तंट्याचे निराकरण करणाऱ्या, पुरस्काराच्या प्रतीक्षेतील तंटामुक्त गाव समित्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेला ग्रामविकासाच्या संकल्पनेनुसार तत्कालीन ग्रामविकास मंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी (ता.१५) ऑगस्ट २००७ साली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविली. ग्रामपंचायतीच्या जाहीर ग्रामसभेद्वारे गठित झालेल्या तंटामुक्त समित्यांना दरवर्षी ३० सप्टेंबरनंतर मोहीम कालावधीत नव्याने निर्माण झालेले तंटे मिटविण्याचे काम करावे लागते.
हेही वाचा -लगट केली, पाठलाग केला, रस्त्यात अडवून हात धरला आणि...
समितीच्या जबाबदाऱ्या
अस्तित्वातील तंट्याचे ज्या प्रमाणे वर्गीकरण करून नोंदवहीत नोंद ठेवणे, त्याप्रमाणे नव्याने निर्माण झालेल्या तंट्याचे वर्गीकरण करणे, गावामध्ये एखादा तंटा निर्माण झाल्यास शक्यतोवर तंटा घडलेल्या ठिकाणाजवळ राहणाऱ्या तंटामुक्त गाव समितीच्या सदस्याने संबंधित प्रकरणात हस्तक्षेप करणे अपेक्षित आहे.
म्हणजे कोणत्याही कारणावरून वाद उद्भवला असेल तर सदस्याने तो मिटविण्याचा प्रयत्न करावा, असा हस्तक्षेप करूनही तंटा मिटण्याची शक्यता दिसत नसल्यास सदस्य समितीच्या अध्यक्षांशी संपर्क साधून त्यांची मदत घेऊ शकतो. त्यानंतर समितीमार्फत उभय पक्षकारांमध्ये समझोता करण्याचा प्रयत्न केला जातो. नवीन निर्माण झालेले तंटेही अस्तित्वातील तंटे सामोपचाराने मिटविण्याच्या कार्यपद्धतीप्रमाणे मिटविण्याची कार्यवाही समितीला करावी लागते.
पोलिस खात्यशी समन्वय
गावात कधी कधी एखादा तंटा असा घडला असेल, पण तो कोणत्याच माध्यमातून समितीसमोर आला नाही तर समिती त्याबाबतीत ऐकीव माहितीवर प्रत्यक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जाणून घेऊ शकते. त्यात तथ्य आढळून आल्यास तो तंटाही समितीला विचारात घ्यावा लागतो. नव्याने निर्माण झालेले मिटलेल्या तंट्याची नोंदही समितीला स्वतंत्रपणे करावी लागते. मोहिमेच्या काळात काही लोकांचे अर्ज परस्पर पोलिस ठाण्यात जातात.
अशा प्रकरणात पोलिस ठाणे प्रमुखास सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार त्याची दखल घेऊन चौकशी व कारवाई करावी लागते. मात्र, असा अर्ज प्राप्त झाल्यावर त्या अर्जातील या मोहिमेमध्ये मिटविता येणारे तंट्यामध्ये जे तंटे मोडतात, त्यांच्या अर्जाची एक प्रत तंटामुक्त गाव समितीकडे पाठविली जाते. त्यामुळे समितीलाही अशा प्राप्त अर्जाची दखल घेऊन तक्रार मिटविण्याचा समांतर प्रयत्न करता येतो.
येथे क्लिक करा - ‘कोरोना’चा कशावर झाला परिणाम, ते वाचाच
पुरस्कार वितरित करण्याची मागणी
ग्रामीण भागात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर तंटे समोपचाराणने मिटविण्यासाठी कार्यरत तंटामुक्त गाव समित्यांना सरकारकडून पुरस्कार वितरित करण्यात येतात. मात्र, मागील फडणवीस सरकारने २०१५ पासून आघाडी सरकारची योजना म्हणून तंटामुक्त समित्यांचे पुरस्कार वाटप केले नाहीत. मागील सरकारने प्रलंबित ठेवलेल्या तंटामुक्त गाव अभियानाचे पुरस्कार महाविकास आघाडी सरकारने वितरित करण्याची मागणी समित्यांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.