Sandipan Patil Bhumre esakal
मराठवाडा

Shiv Sena Politics : खासदार संदिपान भुमरेंचा ठाकरे गटाला दणका; सरपंचांचा 'इतक्या' ग्रामपंचायत सदस्यांसोबत शिंदे गटात प्रवेश

उबाठा गटाच्या वतीने (Uddhav Thackeray) सरपंच पदासाठी डिसेंबर २०२२ मध्ये भरघोस जनतेच्या वतीने सरपंच अशोक धर्मे यांची सरपंच पदासाठी निवडणुकीतून निवड झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

ह्या प्रवेशाचा पैठण विधानसभा निवडणुकीत (Paithan Assembly Elections) मोठ्या प्रमाणावर शिंदे गटाला फायदाच होणार आहे.

बिडकिन : उबाठा गटाचे पैठण तालुक्यातील बिडकिन ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच अशोक भानुदास धर्मे यांनी पाच ग्रामपंचायत सदस्यांसोबत रविवारी (ता. ३०) नवनिर्वाचित खासदार नामदार संदिपानजी पाटील भुमरे (Sandipan Patil Bhumre) यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयात शिंदे गटात प्रवेश केला आहे. ह्या प्रवेशाचा पैठण विधानसभा निवडणुकीत (Paithan Assembly Elections) मोठ्या प्रमाणावर शिंदे गटाला फायदाच होणार आहे.

उबाठा गटाच्या वतीने (Uddhav Thackeray) सरपंच पदासाठी डिसेंबर २०२२ मध्ये भरघोस जनतेच्या वतीने सरपंच अशोक धर्मे यांची सरपंच पदासाठी निवडणुकीतून निवड झाली होती. बिडकिन येथील सरपंच अशोक धर्मे यांनी ग्रामपंचायत सदस्य किरण गुजर, सागर फरताळे, मोहन हिवाळे, ज्ञानेश्वर कांबळे, रमेश शिंदे यांच्यासह पक्षात प्रवेश केला आहे. आज अचानक सरपंच व पाच ग्रामपंचायत सदस्य यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

खासदार नामदार संदिपान पाटील भुमरे यांच्या नेतृत्वाखाली गावाची मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लावण्यासाठी आज हा निर्णय मी घेतला आहे. बिडकिन गावाचा विकास व्हावा, यासाठी मी सदैव तत्पर राहणार आहे, असे वक्तव्य सरपंच अशोक धर्मे यांनी केले. शिंदे गटात पक्षप्रवेश‌ होत असताना याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश पवार, युवासेना जिल्हाप्रमुख काकासाहेब टेके, माजी उपसरपंच बबनराव ठाणगे, उपतालुका प्रमुख मधुकर सोकटकर, विभाग प्रमुख दिगंबर कोथंबिरे आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahaviskas Aghadi: महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढती होणार? काँग्रेसच्या बड्या नेत्याने थेटच सांगितलं, 'यंदा पंजा' गाणं केलं लाँच

Palghar: शिंदे गटात उभी फूट... एक गट बंडखोर उमेदवाराच्या तर दुसरा महायुतीच्या रॅलीत सहभागी, वातावरण तापलं!

RBI Gold: धनत्रयोदशीला RBIने ब्रिटनमधून आणले 102 टन सोने; महाराष्ट्रातील कोणत्या दोन शहरात ठेवणार?

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

जगायचंय तर वाघासारखे, शेळी होऊन...! Hardik Pandya ची IPL Retention पूर्वी पोस्ट चर्चेत

SCROLL FOR NEXT