GA Ugale Passed Away esakal
मराठवाडा

Satyashodhak Samaj : सत्यशोधक चळवळीची मोठी हानी! ज्येष्ठ विचारवंत जी‌. ए. उगले यांचे Cancer ने निधन

सकाळ डिजिटल टीम

गेवराई (जि. बीड) येथे झालेल्या सत्यशोधक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गेल्या तीस वर्षांपासून सत्यशोधक चळवळीत ते संशोधक व अभ्यासक म्हणून सक्रिय राहिले.

पैठण : अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे (Satyashodhak Samaj) माजी अध्यक्ष, सत्यशोधक चळवळीचे भाष्यकार, लेखक, विचारवंत प्रा. जी. ए. उगले (वय ७१) कर्करोगाने (Cancer) आज सकाळी साडेआठ वाजता पैठण येथे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी दोन वाजता पैठण येथे होईल.

प्रा. उगले गेल्या तीस वर्षांपासून सत्यशोधक साहित्याचे आणि चळवळीचे संशोधन करीत होते. त्यांनी 'ज्ञानोदय आणि महात्मा फुले', 'सावित्रीबाई फुले', 'महात्मा फुले : मुक्त चिंतन', 'संपादक तान्हुबाई बिर्जे', 'सत्यशोधकांचे ओतूर', 'सावित्रीबाई रोडे', 'सत्यशोधक तुकाराम पिंजण', "सत्यशोधक समाजाची अधिवेशने : चिंतन आणि चर्चा', 'सत्यशोधकांचे अंतरंग', 'सत्यशोधक चळवळीचा समग्र इतिहास', 'सत्यशोधक मुकुंदराव पाटील', 'सत्यशोधकी झेंडा' असे वीस मौलिक ग्रंथ लिहिले.

अजून सहा ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. गेवराई (जि. बीड) येथे झालेल्या सत्यशोधक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गेल्या तीस वर्षांपासून सत्यशोधक चळवळीत ते संशोधक व अभ्यासक म्हणून सक्रिय राहिले. पूर्णपणे सत्यशोधकी विचाराने जीवन जगले आणि पदरमोड करून सत्यशोधकी साहित्याचे संशोधन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Darshan: लालबाग राजाच्या चरणी सामान्यांचे हाल, मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार, काय केला आरोप?

Hit And Run : 'हिट अँड रन' घटनेत दुचाकीवर मागे बसलेल्याचा तरुणाचा जागेवरच मृत्यू; दहिसर येथील एक्सप्रेसवेवरील प्रकार

Ashi Hi Banva Banvi : "यावर लोकं हसतील का?" ; जेव्हा धनंजय माने इथेच राहतात का ? डायलॉगवर लेखकानेच व्यक्त केली शंका

Freedom Fighter : स्वातंत्र्य सैनिकांना धक्का! 3000 पाल्यांच्या नोकऱ्या जाणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Chhagan Bhujbal On Jarange Patil: पवार, टोपेंनी जरांगेंना पुन्‍हा उपोषणाला बसविले; छगन भुजबळ यांचा दावा, जरांगेवर टीका

SCROLL FOR NEXT