mudhhkhed.jpg 
मराठवाडा

९४ लाखांचा अपहारप्रकरणी दुय्यम निबंधकास अटक

गंगाधर डांगे


मुदखेड, (जि. नांदेड) ः येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट ई-चालनाद्वारे ९४ लक्ष २२ हजारांचा अपहार करून शासनाच्या महसूलला ‘चुना’ लावणाऱ्या संगणकचालकाचा नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी दुय्यम निबंधकाचा सदर गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याने मंगळवारी (ता. २८) त्यास अटक करण्यात आली.

बनावटी ई-चालनाद्वारे शेती आणि भूखंडाचे खरेदी खत
(ता. आठ) जानेवारी २०२० रोजी दुय्यम निबंधक श्रेणी-१ शरद काळे यांनी मुदखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार (ता. २४) एप्रिल २०१७ ते १९ जानेवारी २०१९ या काळात मुदखेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये १५९ बनावटी ई-चालनाद्वारे शेती आणि भूखंडाचे खरेदी खत करतांना त्यानुसार होणारे महसूल उत्पन्न बुडवून शासनाला चुना लावला.  प्रदीर्घ काळानंतर नांदेडच्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली. या बाबत मुद्रांक आयुक्तांनी चौकशी करून तत्कालीन दुय्यम निबंधक प्रशांत कल्याण अंत्रेडी यांना निलंबित केले होते. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षक विश्वांभर पल्लेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत निलंबित दुय्यम निबंधकास अटक केली आहे. या कामी पोलिस कर्मचारी विनायक मठपती व मनोज राठोड यांनी त्यांना सहकार्य केले.

हेही वाचा -  ‘मरासु’ महामंडळाच्या जवानांचे शानदार संचलन ​
बनावट ई-चलनाच्या माध्यमाने त्यात खाडाखोड करून ती रक्कम रोख भरली असे दाखविण्याचा अनागोंदी कारभार करणारे रोहितसिंह सुरेशसिंह बिसेन आणि पांडुरंग व्यंकट कुलकर्णी (दोघे रा. बिसेननगर, नवा मोंढा, नांदेड) याच्या विरुद्ध मुदखेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने या आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर सदरील दोन आरोपी अद्यापही फरार असल्याचे समजते. दरम्यान, या अपहार प्रकरणात अन्य काही आरोपी अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे, तर या प्रकारानंतर मुदखेड व अर्धापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे विभागीय चौकशीचा ससेमिरा लागला आहे. या प्रकरणात दुय्यम निबंधक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे बोलले जात असून काही निवडक कर्मचारी व अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याच्या चर्चेला उधान आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरातील तपोवन मैदानावर योगी आदित्यनाथांची आज जाहीर सभा

Winter Soup Recipe: हिवाळ्यात सकाळी नाश्त्यात प्या गरमागरम गाजर सूप! शरीर राहील उबदार, लगेच लिहा रेसिपी

Sakal Podcast: फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक ते मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्या

आजचे राशिभविष्य - 17 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT