उदगीर : रेल्वेस्टेशन समोरील बसवेश्वर चौकात आरोपी अमित उर्फ सोन्या प्रकाश नाटकरे याने धारदार चाकूने जगदीश किवंडे यांस शुल्लक कारणावरुन मारहाण केली होती त्यात याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी जिल्हा व सञ न्यायालयाने मंगळवारी (ता.२) आरोपी सोन्या नाटकरे यास जन्मठेप पाच हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
मयताची आई नामे सुनिता विजय किवंडे हिच्या तक्रारीवरुन उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करुन गुन्हयाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. व सदरील सत्र खटला अति. जिल्हा सत्र न्यायालय, उदगीर पिठासन अधिकारी पी.डी. सुभेदार यांच्या न्यायदालनात चालला व यात सरकार पक्षाच्या वतीने एकुण १३ साक्षिदारांची साक्ष नोंदविण्यात आली.
सरकार पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या साक्षिदारांच्या साक्षिपुराव्यांवर व कागदपत्रावरती तसेच सरकारी वकील शिवकुमार गिरवलकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश,
उदगीर यांनी सदरील आरोपीस जन्मठेपेची व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. सदरील प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील म्हणून अॅड. शिवकुमार गिरवलकर यांनी काम पाहिले. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी सिकंदर शेख यांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.