bhat 
मराठवाडा

गंभीर बाब उघडकीस, कोरोना बाधितांच्या जेवणात चक्क मेलेले मुंगळे... 

गणेश पांडे

परभणी ः कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात चक्क मेलेले मुंगळे आढळल्याची खळबळजनक घटना बुधवारी (ता.१२) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे कोरोना बाधित रुग्णांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे थेट जेवणाचे फोटोच पाठविण्यात आले आहेत. 

परभणी जिल्ह्यात दररोज ५० च्यावर बाधित रुग्ण सापडत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणु संसर्गावर उपाययोजना करतांना प्रशासनाची त्रेधा तिरपीट उडत आहे. तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार जनतेसमोर आला आहे. 

जेवनाच्या पाकिटांचे फोटो काढून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले 
शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या नवीन इमारतीमध्ये कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना शासनाच्यावतीने दररोज जेवण दिले जाते. परंतू, हे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी येत आहेत. बुधवारी (ता.१२) रात्री या रुग्णांना जेवणात भात देण्यात आला. या भातामध्ये चक्क मेलेले मुंगळे असल्यामुळे रुग्ण संतप्त झाले. काही रुग्णांनी तातडीने या पाकिटांचे फोटो काढून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना व्हॉटसअपद्वारे पाठविले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली जाईल असे या रुग्णांना सांगून शांत केले आहे. दरम्यान, रुग्णांना निकृष्ठ जेवण दिले जात असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. रुग्णांनी स्वतःच या जेवणाचा पंचनामा करून त्याच्यावर स्वाक्षऱ्या करून त्याची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविली आहे.

परभणी जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू 
परभणी ः जिल्ह्यात बुधवारी एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. यातील पाच जण परभणी शहरातील तर एकजण पुर्णा शहरातील आहे. यामध्ये पाच पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. मृतांमध्ये मुमताज नगर येथील ६४ वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील ६५ वर्षीय पुरुष, कालाबावर येथील ६५ वर्षीय पुरुष, वडगल्ली येथील ५९ वर्षीय पुरुष, हर्ष नगर येथील ५५ वर्षीय महिलेचा आणि पुर्णा शहरातील सिध्दार्थ नगर येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ६० इतकी झाली आहे.

बुधवारच्या रॅपिड टेस्टमध्ये २३ जणांना बाधा 
परभणी ः विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशानंतर महापालिकेने बुधवारी (ता.१२) शहरात रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर वाढवण्यासाठी जागांची शोधाशोध सुरू केली आहे. 
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता.११) झालेल्या बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांना शहरात रॅपिड टेस्ट सेंटर वाढविण्याची सूचना केली होती. शहराची लोकसंख्या पाहता त्यानुसार प्रत्येक भागात एक सेंटर सुरू करावे असे आदेशही त्यांनी दिले होते. बुधवारी महापालिकेचा आरोग्य विभाग शहराच्या विविध भागांत जाऊन सेंटरसाठी उपयुक्त जागांचा शोध घेत होता. त्यापैकी काही जागादेखील निश्चित केल्या आहेत. 
महापालिकेने सद्यःस्थितीत शहरात चार सेंटर्स सुरू केले आहेत. सिटी क्लब, उद्देश्वर विद्यालय, रोकडा हनुमान मंदिर आणि आयएमए हॉलमध्ये हे सेंटर असून तेथे मोठ्या संख्येने व्यापारी, विक्रेत्यांची गर्दी होताना दिसून येत आहे. अनेकांना टेस्टसाठी तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. त्यातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्यादेखील झपाट्याने वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या सूचनेवरून महापालिकेनेदेखील शहरात दहा ते बारा सेंटर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांनी बुधवारी दिवसभर शहरातील विविध भागांतील शासकीय-निमशासकीय जागांची पाहणी करून काही जागा निश्चित केल्या आहेत. गुरुवारपासून त्या ठिकाणी सेंटर्स सुरू केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेच्या वतीने बुधवारी (ता.१२) शहरातील पाच केंद्रांवर व्यापाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये ३८२ पैकी २३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. सिटी क्लब येथे ७४ पैकी दोन, उद्देश्‍वर विद्यालयात ७० पैकी नऊ, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉल येथे १०९ पैकी सात, नवा मोंढ्यातील रोकडा हनुमान मंदिर येथे ९९ पैकी तीन तर अपना कॉर्नरजवळील वाचनालय येथे ३० पैकी दोघांची चाचणी पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांनी दिली. 

परभणी जिल्हा 
एकूण बाधित - १२५२
आजचे बाधित - ५९
आजचे मृत्यु - सहा 
एकूण बरे - ४९४
उपचार सुरु असलेले - ६९८
एकूण मृत्यु - ६०

संपादन ः राजन मंगरुळकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT