छत्रपती संभाजीनगर: ‘‘सरदार पटेल यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांचे नेतृत्व केले. पंडित नेहरूंना उद्याचा भारत आधुनिक भारत हवा होता. बाबासाहेब आंबेडकर याच आधुनिकीकरणासाठी आग्रही होते. केवळ देशाची राज्यघटनाच नव्हे तर देशाची शेती, उद्योग, जलसिंचन यातील धोरणात्मक निर्णयामध्ये बाबासाहेबांचे अमूल्य योगदान आहे’’, असे उद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी काढले.
शेषराव चव्हाण लिखित ‘९० नॉटआउट’, ‘नेहरू-पटेल रिलेशन-मिथ ॲण्ड रिॲलिटी’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरः डिसअपॉइंटेड ॲण्ड डिसील्यूइन्ड इन द इव्हिनिंग ऑफ द लाइफ’ आणि ‘कलप्रिट्स ऑफ पार्टिशन’ या चार इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष कमलकिशोर कदम होते.
पवार म्हणाले, ‘‘ देश पुढे न्यायचा असेल, तर देशाच्या उभारणीत आधुनिक विज्ञानावर लक्ष केंद्रित करणारे नेते हवेत. महात्मा गांधींनी ही भूमिका सरदार पटेलांकडे मांडली. या दोघांचाही निर्णय नेहरूंच्या माध्यमातून झाला.’’
तुम्ही ‘ते’ लिहायला नको होतेः कदम
‘‘महात्मा गांधी हे फाळणीचे गुन्हेगार होते, या मताशी मी सहमत नाही. गांधींनी शेवटपर्यंत फाळणीला विरोध केला. ते या देशाच्या फाळणीचा भाग नव्हतेच, तर सर्वांनी एकत्र गुण्यागोविंदाने राहावे, असे वाटणारे मानवतावादी संत होते. गांधींकडे माणसाचा पुरेपूर निकष पूर्ण होता. म्हणूनच त्यांनी नेहरू आणि पटेल यांना त्यांचे काम करू दिले. पण, सुधींद्र कुलकर्णी यांनी तुम्हाला जे लिहायला लावले, तुम्ही ‘ते’ लिहिले नसते बरे झाले नसते,’’ या शब्दांत कमलकिशोर कदम यांनी शेषराव चव्हाण यांना या कार्यक्रमात सुनावले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.