Killari Earthquake Thirty Years : तीस वर्षांपूर्वी मराठवाड्यातील लातूर-धाराशिव जिल्ह्यात ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाप्रलयंकारी भूकंपाचे जोरदार हदरे बसले. या भूकंपामुळे लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे मोठी जीवीतहानी झाली. गणेश विसर्जन मिरवणुक संपवून झोपलेल्या किल्लारीकरांवर अचानक काळाने झ़डप घातली. या भूकंपात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान या भूकंपावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते. या भूकंपाला ३० वर्षे पूर्ण होत असताना किल्लारीतील नागरिकांनी शरद पवारांनी तेव्हा केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला आज शरद पवार हजर राहणार आहेत. सकाळी दहा वाजता किल्लारीतील क्रांतिकारी मैदानावर शरद पवारांचा हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी क्रांतिकारी मैदानावर त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे.
तीस वर्षांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपामधून उभं राहण्यासाठी किल्लारी आणि परिसरातील नागरिकांना पुन्हा हिंमतीने उभे राहण्यासाठी पवारांनी मुख्यमंत्री म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. शरद पवारांनी भूकंपानंतर तत्काळ लातूर गाठलं होतं. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी खांद्यावर असलेल्या शरद पवार यांनी थेट किल्लारी गाठून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कामाला लावली. तसेच पुढील काळात जलद गतीने कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.