Sharad pawar  sakal
मराठवाडा

Sharad pawar : शिवाजीरावांमुळे गेवराई भाग सुजलाम्-सुफलाम्

पद्मविभूषण ज्येष्ठ नेते शरद पवार; शिवाजीराव पंडित यांचा अभीष्टचिंतन सोहळा

सकाळ वृत्तसेवा

गेवराई : दुष्काळात राज्यात बीडचे नाव आघाडीवर असायचे. त्याकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून दुष्काळी उपाययोजनांत शिवाजीराव पंडित यांनी प्रभावी काम करून लोकांना दिलासा दिला. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे जायकवाडी धरणाचा उजवा कालवा झाला. या कालव्यामुळे या तालुक्यातील शेतकरी सन्मानाने जगत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, पद्मविभूषण खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

जिल्ह्याच्या राजकारणातील भीष्माचार्य अशी ओळख असलेल्या शिवाजीराव पंडित यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. नऊ) गेवराई येथे त्यांचे श्री. पवार यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत अभीष्टचिंतन करण्यात आले. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री धनंजय मुंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शरद पवार म्हणाले, शिवाजीराव पंडित यांनी जयभवानी सहकारी साखर कारखान्याची उभारणी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा दिला. शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिवाजीरावांमुळे गेवराई भाग सुजलाम्-सुफलाम्त्यांनी या भागात शाळा-महाविद्यालयांचे जाळे उभारून सामान्यांना शिक्षणाची सोय करून दिली.

पद गेल्यानंतर सर्वस्व गेल्यासारखे अनेक लोक दिसतात. मात्र, पंडित यांनी स्वत: राजकारणातून निवृत्ती घेत उत्तम शेती करून नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांची मुलेही निर्व्यसनी असून, तालुक्यासाठी कायम झगडत असतात. पंडित यांनी तुमच्यासाठी ५० वर्षे काम केले असून, पुढच्या पिढीला पाठबळ द्या, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले. बीडचे लोक ठरविले तर काहीही करतात. कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार व साताऱ्याचे रहिवासी क्रांतिसिंह नाना पाटील यांना या जिल्ह्याने खासदार केले. त्यामुळे पंडित परिवाराला साथ द्या, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले.

यावेळी आमदार सर्वश्री प्रकाश सोळंके, सुरेश धस, बाळासाहेब आजबे, संदीप क्षीरसागर, सतीश चव्हाण, विक्रम काळे, राहुल पाटील, माजी आमदार सर्वश्री राजन पाटील, विलास खरात, साहेबराव दरेकर, भीमराव धोंडे, स्वागताध्यक्ष राजेश्वर चव्हाण, राजेंद्र जगताप, पृथ्वीराज साठे, सय्यद सलीम, जनार्दन तुपे, सिराज देशमुख, राजकिशोर मोदी, सनदी अधिकारी श्री. घोडके, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र काळे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, जयसिंह पंडित उपस्थित होते. अमरसिंह पंडित यांनी प्रास्ताविक केले.

पवारांकडून जुन्या सहकाऱ्यांची आठवण

शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत दिवंगत उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके, गोविंदराव डक, बाबूराव आडसकर यांचीही आठवण काढली. आडसकर यांची हाबाडा ही ओळख असल्याने हाबाडा माहीत आहे का, असेही त्यांनी विचारले. या निमित्ताने जुन्या काळातील सहकाऱ्यांना भेटता आले असेही ते म्हणाले.

कोण काय म्हणाले...

रावसाहेब दानवे : आताच्या वातावरणामुळे पत्रिकेतील नावे बघून जावं की न जावे, अशी मनःस्थिती होती. पण, शरद पवार येताहेत म्हणून गुजरातहून आलो. पूर्वी जालना लोकसभेत गेवराईचा भाग असताना मी शिवाजीराव पंडित यांचा सल्ला विचारला तर ‘आपण पवारांचे पाईक’ असल्याने सांगू शकत नाही, असे ते म्हणायाचे. यावरून त्यांची निष्ठा लक्षात येते.

अंबादास दानवे : शिवाजीराव पंडित यांच्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला हातभार लागला. उजव्या कालव्यामुळे हा भाग सुजलाम् सुफलाम् आहे.

संदीपान भुमरे : रोहयो मंत्री म्हणून अनेक योजना राबविल्या. शिक्षण, सहकार, शेतीमध्ये त्यांनी मोठे काम केले.

जयंत पाटील : स्वाभिमानाने राजकारण केलं. त्यांनी जायकवाडी कालवा आणल्यामुळेच लोकांचे दैन्य दूर झाले. पराभवानंतर विजयसिंह पंडितही दुसऱ्याच दिवशीपासून कामाला लागले. त्यांना आमदार करा.

श्रीनिवास पाटील : थ्री एस. एकत्र (शरद पवार, शिवाजीराव पंडित, श्रीनिवास पाटील), दोघांची तिरकी टोपी अन् पिळदार मिशा, आज शरद पौर्णिमेला दूध बारामतीचे अन् साखर जयभवानीची असा योगायोग आहे.

धनंजय मुंडे : वय झाले असले तरी शिवाजीराव पंडित वय व बुद्धीने तरुण आहेत. त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात हुकूमत गाजविली.

राजेश टोपे : पंडित - टोपे कुटुंबीयांचे जुने ऋणानुबंध. आमच्या गावांतून फक्त गोदावरीच जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT