shasan aplya dari scheme bjp devendra fadnavis expense beed esakal
मराठवाडा

Shasan Aplya Dari : ‘शासन नको दारी’ भाजपकडून फडणवीसांना सांगावा

कार्यक्रमाच्या नावाखालील उधळपट्टी ः अवाजवी खर्चामुळे जनमानसात प्रतिमा मलिन

दत्ता देशमुख : सकाळ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्याच्या मुख्यालयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणारा ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम परळीत निश्चित झाला. मात्र, कार्यक्रमावरील राष्ट्रवादीचा पगडा आणि कार्यक्रमाच्या नावाखाली होणारी अवाजवी उधळपट्टी यामुळे जनमानसात सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचा संदेश जिल्ह्यातील भाजपजनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानी घातला आहे.

शिवाय शासन आपल्या दारी कार्यक्रमच नको, असा सांगावा देखील पक्षाच्या नेत्यांनी धाडला आहे. दरम्यान, परळीत होणाऱ्या संभाव्य ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी तीन दिवसांचा मंडप उभारण्यासाठी तब्बल दोन कोटी २१ लाख ९० हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंबाजोगाईच्या कार्यकारी अभियंत्यांनी याबाबत निविदा देखील मागविल्या आहेत. या अवाजवी खर्चाची सध्या नेटकरी व विरोधी पक्षाकडून खिल्ली उडवली जात आहे. अगोदर शिवसेना - भाजपचे सरकार असताना ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला शिवसेना यासाठी आग्रही होती.

मात्र, या उपक्रमासाठी मंडप, जेवण, लोकांना आणणे यासाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा निधी कोठून उभारायचा असा जिल्हा प्रशासनासमोर पेच होता. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून या कार्यक्रमास नकार घंटा कळविली जात होती.

दरम्यान, सत्तेत पुन्हा राष्ट्रवादीची एंट्री झाली. या कार्यक्रमासाठी मंडप, जेवण व लोकांना आणण्यासाठीच्या खर्चाचे नियोजनही करण्यात आले. परंतु, बीडला ऑगस्ट महिन्यात निश्चित झालेल्या या कार्यक्रमाची तारीख वाढवून पुन्हा ता. १६ सप्टेंबर ठरली.

मात्र, हा मुहूर्त देखील पुढे ढकलला असून जिल्ह्याच्या मुख्यालयी होणारा हा उपक्रम परळीत करण्याचे निश्चित झाले. ता. १९ ते २२ या चार दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत परळीत कार्यक्रम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली.

परळीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी शामीयाना (मंडप) उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंबाजोगाई येथील कार्यकारी अभियंत्यांनी सव्वा दोन कोटी रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध केली आहे. यावर टीका सुरु झाली आहे. नेटकरी व विरोधक तर तुटून पडलेच आहेत. शिवाय सत्तेतील भाजपनेही अंतर्गत या उपक्रमाबाबत ‘नकार घंटा’ वाजविण्यास सुरुवात केली आहे.

अवाजवी खर्चामुळे जनमानसात सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचे जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आहे. तसेच, परळीत उपक्रम होणार असल्याने या कार्यक्रमावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचाच वरचष्मा राहणार असून भाजप दुय्यम असल्याची सलही नेत्यांत आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून प्रशासन देखील संभ्रमात आहे.

शासनाच्या योजनांचा लोकांना किती सहज लाभ मिळतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यात उपक्रमाच्या नावाखालील उधळपट्टी यामुळे सामान्यांची नाराजी पुढे करत भाजपनेत्यांनी श्री. फडणवीस यांना हा ‘कार्यक्रमच नको’ असे सांगितले आहे. दरम्यान, ता. २० सप्टेंबरपर्यंत अपेक्षीत कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलली आहे.

भाजपजनांची इच्छापूर्ती होईल का?

बीडला होणारा कार्यक्रम पुन्हा परळीत घेण्याचे ठरले आहे. बीड हे जिल्ह्याचे मुख्यालय आणि मध्यवर्ती ठिकाण असतानाही सत्ताकेंद्र बदलल्याने शासन आपल्या दारी उपक्रमाचे ठिकाणही बीडहून परळीला हलले.

त्यामुळे आष्टीच्या लाभार्थींना दोनशे किलोमीटरचा फेरा मारावा लागणार आहे. हीच गत गेवराई, बीड, पाटोदा व शिरुर कासारच्या लाभार्थ्यांची होणार आहे. यासह कार्यक्रमावर होणारा कोट्यवधींचा खर्चाचा मुद्दाही भाजपजनांनी पुढे करत कार्यक्रमच नको, अशी मागणी केली आहे. त्यांची इच्छापूर्ती होणार का? हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT