shravan bal scheme 5 thousand 997 documents incomplete beed sakal
मराठवाडा

५ हजार ९९७ निराधारांचे कागदपत्रे अपूर्ण; न जोडल्यास अनुदान बंद होणार, मदत कक्षात माहिती देण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

बीड : तालुक्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना संख्या हजारांच्या घरात आहे. सद्यस्थितीत शहरातील तब्बल ५ हजार ९९७ लाभार्थ्यांनी त्यांची कागदपत्रे डीबीटी पोर्टलला अपलोड केली नसल्याचे समोर आले आहे.

योजनेतील लाभार्थीचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक न केल्यास त्यांचे अनुदान बंद होण्याची अधिक शक्यता बळावली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बीड विधानसभा अध्यक्ष अमर नाईकवाडे यांनी शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारात शुक्रवारपासून मदत कक्ष सुरू केला असून लाभार्थीचे डीबीटीसाठीची कागदपत्रे तहसील कर्मचाऱ्यांमार्फत ऑनलाइन अपलोड केली जाणार आहेत.

शहरातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या ५ हजार ९९७ लाभार्थीनी त्यांची कागदपत्रे डीबीटी पोर्टलला अपलोड केली नसल्याची माहिती समोर आली आहे. बीड शहरात ५ हजार ९९७ लाभार्थीनी त्यांची कागदपत्रे डीबीटी पोर्टलला अपलोड केलेली नाहीत.

त्यासाठी या दोन्ही योजनेच्या लाभार्थीना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बीड विधानसभा अध्यक्ष अमर नाईकवाडे यांनी बीड तहसील कार्यालयात शुक्रवारपासून मदत कक्ष कार्यान्वित केला आहे.

शहरातील लाभार्थीनी कागदपत्रांच्या छायांकित प्रती घेऊन येऊन ते अपलोड करावीत. बीड तालुक्यातील ग्रामीण भागातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थीनी डीबीटी प्रक्रियेसाठी कागदपत्रे तलाठी कार्यालयात सादर करावयाची आहेत.

डीबीटीसाठी आधार कार्ड, बँक पासबुक कागदपत्रे आवश्यक

संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील ज्या लाभार्थीचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलेले नाही त्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक, एक पासपोर्ट फोटो, जे दिव्यांग असतील त्यांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतींसह बीड तहसील कार्यालयाच्या प्रांगणातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मदत कक्ष येथे उपस्थित राहून जमा करावे लागणार आहेत. संबंधितांनी तातडीने कक्षाला भेट देत कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन अमर नाईकवाडेंनी केले.

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आता डीबीटीमार्फत रक्कम थेट खात्यावर पडणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत आवश्यक कागदपत्रे जमा करावीत. तसेच बँक खात्याला आपला नंबर देखील लिंक करून घ्यावा.

- चंद्रकांत शेळके, तहसीलदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Pager Blasts : लेबनॉन पेजर स्फोटांमागे केरळमध्ये जन्मलेल्या व्यक्तीचा हात? तपासात धक्कादायक खुलासा

YouTuber Truck Driver : ट्रक ड्रायव्हरचा थक्क करणारा प्रवास, रेसिपीचे व्हिडिओ पोस्ट केले अन् बनला करोडपती!

Sachin Pilgaonkar : तर रडकी नाही कॉमेडी असती 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिका ; सचिन यांचा महत्त्वपूर्ण खुलासा

Call History Check : गेल्या 6 महिन्यांची कॉल हिस्ट्री मिळवा एका क्लिकमध्ये..

भारताची Chess Olympiad स्पर्धेतील मानाची ट्रॉफी चोरीला? AICFच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT