नांदेड : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी करत प्रशासनाच्या माध्यमातून मागील तीन दिवसांत विविध सोळा आदेश काढले आहेत. यात शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, आठवडे बाजार, धार्मिक स्थळे आदी गर्दीच्या ठिकाणी नागरिक एकत्र येणार नाहीत याची खबरदारी घेतली आहे.
प्रतिबंधात्मक कायदा लागू
देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ ता. १३ मार्चपासून लागू करून खंड दोन, तीन व चारमधील तरतुदीनुसार ता. १४ मार्चपासून अधिसूचना निर्गमित केली आहे. या साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने सक्षक प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
जिल्हाधिकारी सक्षम प्राधिकारी
या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन यांच्यासह इतर विभागप्रमुखांच्या माध्यमातून ता. १५ मार्च ते ता. १७ मार्च या कालावधीत विविध सोळा आदेश जारी केले आहेत.
तीन दिवसात काढले सोळा आदेश
रविवारी (ता. १५) जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक विषयक कार्यक्रमांना प्रतिबंध घातला आहे. याच दिवशी शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था बंद ठेवणे, महापालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील सरकारी व खासगी अंगणवाड्या बंद ठेवणे. चित्रपटगृह, तरणतलाव, व्यायाम शाळा, नाट्यगृह व म्युझियम बंद ठेवणे. शॉपिंग मॉल बंद करणे, खासगी शिकवणी व अभ्यासिका केंद्र बंद ठेवणे. शहरी लगतच्या शैक्षणिक संस्था बंद ठेवणे. ता. १६ मार्च रोजी आठवडे बाजार बंद करण्याबाबत आदेश काढला. तर याच दिवशी ग्रामीण भागातील सर्व शासकीय व खासगी शैक्षणिक संस्था बंद ठेवणे, कार्यालयातील बैठका व अभ्यागतांच्या भेटी नियंत्रित करणे आदींबाबत आदेश काढले. तर मंगळवारी (ता. १७) ग्रामीण भागातील अंगणवाड्या बंदचे आदेश दिले. तसेच बॅंका, पोस्ट ऑफिस व एटीएममधील ग्राहकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी आदेश काढले.
हेही वाचलेच पाहिजे....मंदीरफोडीतील अट्टल चोरट्यास अटक
आधार केंद्रही राहणार बंद
आधार केंद्र बंद करण्याचे आदेशही मंगळवारी जारी केले. सर्व धार्मिक स्थळावरील भाविकांची गर्दी कमी करण्यासाठी नियंत्रण आदेश लागू केला. तसेच तूर, हरभरा खरेदी केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी संबधितांना आदेशीत करून मंगळवारीच सर्व प्रकारचे हॉटेल, परमिटरूम, बेकरी, स्वीटमार्ट, चाट भंडार, ढाबा आदी ठिकाणची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आदेश जारी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.