social media friendship cyber crime police Sakal
मराठवाडा

Beed Crime : फेसबुकवरची मैत्री महिलेला पडली महागात

सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ : फेसबुकवरची अनोळखी मैत्री धोकादायक ठरू शकते, हाच प्रकार शहरात घडला. शहरातील एका गृहिणीसोबत फेसबुकवर एकाने मैत्री केली. सतत चॅटिंग करत माहितीची देवाणघेवाण झाली.

या पाठवलेल्या वैयक्तिक माहितीवर महिलेला ब्लॅकमेलिंग करण्यात आले. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.शहरातील शारदानगर भागातील ३२ वर्षीय गृहिणी महिलेने फिर्यादीत म्हटले की, तिची फेसबुकवर अकबर बबन शेख (वय २३, रा. तेलगाव नाका, इंदिरा नगर, बीड) याच्याशी मैत्री झाली. नंतर चॅटींगच्या माध्यमातून ही मैत्री आणखी वाढली.

चॅटींगच्या माध्यमातून विविध प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण झाली. यानंतर संशयित आरोपीने माहितीचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करत महिलेला ब्लॅकमेलिंग केले. संशयिताने फिर्यादीच्या घरी येऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

तसेच १३ मार्च रोजी फिर्यादीच्या पतीस जीवे मारण्याच्या प्रयत्न केला, महिलेला मारहाण केली. तसेच मंगळवारी (ता.२) फिर्यादीच्या घरी येऊन ‘मला कॉल करून का बोलत नाहीस’, असे म्हणत फिर्यादीचा विनयभंग केला. या प्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT