मराठवाडा

Pachod Crime: पोलिसांची मोठी कारवाई, त्या आरोपीला गुन्हे शाखेने केले जेरबंद

हबीबखान पठाण

Latest Pachod News: अडिच महिन्यापूर्वी धूळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचालकास रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवून त्याच्या मोबाईल मधील "गुगल पे" चा पासवर्ड क्रमांक घेऊन बावीस हजार पाचशे एक्कावन्न रुपये व एक मोबाईल चोरून नेणाऱ्या एका जणांस स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पोलिसांनी सुंदवाडी (ता.सिन्नर) येथे शनिवारी (ता.पाच) मोठया शिताफिने अटक केली.

यासंबंधी अधिक माहिती अशी, गौतम मारोतराव दिपके (वय 32 वर्षे) रा.रांजोना (ता.वसमत, जि हिंगोली) व गणेश कराळे रा. बोरी सावंत ता. वसमत जि. हिंगोली हे ता. २४ जुलै रोजी रात्री छत्रपती संभाजीनगर ते बीड रस्त्याने ट्रक (क्र. एम एच२६ बी ई ०५७७) ने तुर घेऊन जात असतांना थापटी तांडा (ता.पैठण) येथील पंजाबी ढाब्यासमोर अज्ञात दोन जणांनी दुचाकीवर येऊन ट्रकला आडवे झाले व गौतम दिपके यास चाकु लावुन त्याच्या जवळील मोबाईल व रोख रक्कम पाच हजार रुपये बळजबरीने काढुन घेवुन त्याचे मोबाईलमधील गुगल पे चा पासवर्ड क्रमांक घेऊन त्याचे मधील २२,५५१ रुपये काढून त्यांचे मोबाईलवर ट्रान्सफर करुन घेतले असल्याची तक्रार शुक्रवारी (ता.२७ सप्टेंबर) पोलीस ठाण्यात दिली होती.

यासंबंधी पाचोड पोलिसांनी लुटमारीच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. पोलिस या प्रकरणातील संशयीताचा शोध घेत असतांना शनिवारी (ता.पाच) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसाना सदरील घटनेतील संशयीत विशाल संपत पवार रा. अंभोडा कदम (ता.मंठा जि जालना) (ह. मु. कानडे मळा, सिन्नर) असल्याचे समजले व तो मौजे सुंदवाडी भागात असल्याची बातमी मिळाली. पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांचे मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीष वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस अंमलदार नामदेव सिरसाठ, वाल्मिक निकम, रविंद्र लोंखंडे, अशोक वाघ, योगेश तरमळे, चालक संजय तांदळे आदींचे एक पथक सुंदवाडी येथे गेले व त्यांनी सापळा रचुन त्यास शिताफिने ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विशाल संपत पवार (वय २४ वर्षे) रा.अंभोडा कदम (ता मंठा जि जालना) (ह मु कानडे मळा सिन्नर जि नाशिक) असे असल्याचे सांगितले.

त्यास गुन्हा बाबत विचारपुस केली असता त्याने नमुद गुन्ह्याची कबुली दिली. त्यास जेरबंद करून पाचोड पोलीस आणून पाचोड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याचेकडून एक मोबाईल व काही आक्षेपार्ह वस्तु जप्त केल्या. पुढील तपास पाचोड पोलिस ठाण्याचे सपोनि शरदचंद्र रोडगे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT